गीता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये परीक्षकाच्या रूपात परतणार
डान्सिंगच्या भावनेला खरोखरच तोड नाही. डान्स तुम्हाला आनंद देतो, उत्साह, ऊर्जा, उत्तेजना
आणि काय काय देतो! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्सचा
सर्वोत्तम मंच आहे, जो आपला चौथा सीझन घेऊन परत येत आहे. याच्या नवीन प्रोमोमध्ये
प्रेक्षकांना विनवणी करण्यात आली आहे की, ‘जब दिल करे डान्स कर’.
हा प्रोमो येथे बघा:
https://www.instagram.com/reel/C8eOvylPPOZ/?igsh=MWx4N3JyYmZmMWFiaA==
प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर पुन्हा एकदा या शोच्या नवीन सत्रात परीक्षक म्हणून दाखल
होत आहे. या वाहिनीने स्वतः विकसित केलेल्या या लोकप्रिय शोमध्ये येताना गीता कपूर आपले
डान्समधले अतुलनीय नैपुण्य आणि पॅशन आपल्या सोबत घेऊन येईल! नावीन्य आणि
सर्जनशीलता अचूक पारखणारी तिची नजर या शोच्या अॅक्ट्समध्ये ‘नवीनतेचा’ शोध घेईल
आणि स्पर्धकांना या मंचावर नव्या आणि स्वतंत्र मूव्ह्ज सादर करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
परीक्षक म्हणून या शोमध्ये परतत असताना आपला उत्साह व्यक्त करताना गीता कपूर
म्हणाली, “इंडियाज बेस्ट डान्सरची सुरुवात झाल्यापासून मी या कार्यक्रमाशी निगडीत आहे. हा
प्रवास अद्भुत होता. चौथ्या सत्रात परत येताना मला खूप आनंद होत आहे आणि नव्या दमाच्या
स्पर्धकांच्या नवनव्या डान्स मूव्ह्ज बघण्यासाठी मी आतुर आहे. या मंचाच्या माध्यमातून
डान्सच्या नव्या पिढीचा शोध घेऊन त्यांना तयार करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, जी पार
पाडायला मला खूप आवडते. यावेळी हे स्पर्धक या मंचावर काय घेऊन येत आहेत हे बघण्यास
मी उत्सुक आहे.”
‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4’ सुरू होत आहे 13 जुलै 2024 रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी
रात्री 8 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!