Breaking
आरोग्य व शिक्षण

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन : प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ सौंदर्यवर्धन नव्हे, तर नवजीवन देणारे शास्त्र – डॉ. प्रणित मानकरे

0 4 7 6 6 8

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन : प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ सौंदर्यवर्धन नव्हे, तर नवजीवन देणारे शास्त्र – डॉ. प्रणित मानकरे

नाशिक : १५ जुलै जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे प्लास्टिक व पुनर्रचनात्मक (Reconstructive) शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात आली. अनेकांच्या मनात प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया अशी समजूत असली, तरी प्रत्यक्षात अपघातग्रस्त, भाजलेले रुग्ण, जन्मजात विकृती, हाताच्या गंभीर दुखापती, कर्करोगानंतरची पुनर्रचना, मधुमेहामुळे झालेल्या जखमा तसेच चेहरा व शरीरावरील गुंतागुंतीच्या जखमांवर उपचार करण्यात प्लास्टिक सर्जरीची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्लास्टिक, पुनर्रचनात्मक व कॉस्मेटिक सर्जन डॉ. प्रणित मानकरे म्हणाले, “प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ सौंदर्य वाढविण्याची शस्त्रक्रिया नाही. रुग्णाचे हरवलेले अवयवांचे कार्य पुन्हा पूर्ववत करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि त्याला पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम करणे हे या शास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि मायक्रोसर्जरीमुळे आज अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करता येत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, रस्ते अपघात, औद्योगिक अपघात, भाजणे, हाताच्या दुखापती किंवा गंभीर जखमांमध्ये वेळेत प्लास्टिक सर्जनचा सल्ला घेतल्यास अपंगत्व टाळता येते आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळतात.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा रीकन्स्ट्रक्शन, बर्न मॅनेजमेंट, हँड सर्जरी, डायबेटिक फूट केअर, कर्करोगानंतरची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, स्कार रिव्हिजन तसेच विविध कॉस्मेटिक शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुभवी तज्ज्ञांकडून केल्या जातात.
जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या पुनर्रचनात्मक किंवा सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियेसाठी केवळ पात्र आणि अनुभवी प्लास्टिक सर्जनचाच सल्ला घ्यावा, असे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 6 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे