Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाचे पोलीस ठाण्यात निवेदन

0 4 7 4 5 5

पत्रकारांना धमकी प्रकरण; खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; निफाड तालुका मराठी पत्रकार संघाचे पोलीस ठाण्यात निवेदन

शिरवाडे वाकद : पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकारांना दिल्या जात असल्याचा आरोप असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कथितपणे शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना धमकावण्याचे प्रकार लोकशाहीसाठी घातक आहेत. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी सन्मानाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या कथित घटनांमुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या सूचनेनुसार हे निवेदन निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, तालुकाध्यक्ष सागर निकाळे, उपाध्यक्ष आशिफभाई पठाण, माणिक देसाई, राहुल कुलकर्णी, विनोद गायकवाड, रवींद्र जाधव, योगेश कर्डीले, अमोल जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे