Breaking
कृषीवार्तादेश-विदेशसामाजिक

*नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी गणनेमध्ये 12 हजार पक्ष्यांची नोंद* 

0 3 2 1 2 3

*नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी गणनेमध्ये बारा हजार पक्ष्यांची नोंद* 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे १९११ मध्ये बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणावरील महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने पक्षी गणना घेण्यात आली.तापमानामध्ये वाढ होत असताना देखील स्थलांतर करणारे पक्षी अजून देखील पक्षी अभयारण्यात बघावयास मिळाले. अफगाणिस्थान,हिमालय मधून येणारा रोझी पिपीट,हिमालयातून येणारा चक्रवाक,अमेरिकेतून येणारा ओस्प्रे हे पक्षी अजून देखील अभयारण्यात बघावयास मिळत आहे. तसेच हिमालय पार करून येणाऱ्या पट्ट कादंब या पक्ष्याची जोडी देखील बघावयास मिळाली. नांदुरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगांव अशा एकुण सात ठिकाणी केलेल्या पक्षीनिरिक्षणात पानपक्ष्यांची संख्या ९९०४, झाडावरील गवताळ भागातील पक्षी १८२१ असे एकुण ११७२५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.यामध्ये थापटया, गार्गनी, मार्श हरियर, वेडा राघु, तसेच स्थानिक पक्षी उघडया चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, कमळपक्षी शेकाटया, नदीसुरय,शंकर,रोझी पिपिट, आदी पक्षी आढळून आले आहे. हिवाळ्यात या परिसरात देशी विदेशी पक्ष्यांचे आगमन होते २८० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात तसेच ४५ जातीचे मासे आणि ४०० पेक्षा जास्त वनस्पती देखील या अभयारण्यात आहेत. अभयारण्याच्या विविध पक्षी निरीक्षण मचाण वरून पक्षीमित्रांच्या सहकार्याने पक्षी गणना करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश पाटील, प्रभारी वनपाल संदीप काळे, वनरक्षक आशा वानखेडे,नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा,आनंद बोरा,गंगाधर आघाव,रोहीत मोगल, विकास गारे. प्रमोद मोगल, गंगाधर आघाव, संजीव गायकवाड, सुनील जाधव, गणेश वाघ, पंकज चव्हाण, रोशन पोटे, प्रमोद दराडे, अमोल दराडे,आदी सहभागी झाले होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे