Breaking
ब्रेकिंग

एक कोटीसाठी तीन भावांची ‘अफरातफरी’!

0 5 1 7 3 0

एक कोटीसाठी तीन भावांची ‘अफरातफरी’!
ट्रेलरने वाढवली उत्सुकता

एक कोटी रुपयांची रक्कम समोर आली की नात्यांमध्येही गणितं बदलू शकतात… आणि जेव्हा ही रक्कम तीन भावांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनते, तेव्हा गोंधळ होणारच! याच गोंधळाला आणखी रंगतदार वळण देणारा ‘अफरातफरी’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेतला गोंधळ अधिकच वाढताना दिसतो. एक कोटी रुपये मिळणार की नाही आणि त्यासाठी तीन भाऊ कोणकोणत्या खेळी खेळणार, याची उत्सुकता ट्रेलरने निर्माण केली आहे.

ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या व्यक्तिरेखांमधील वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. एकीकडे एक कोटींची रक्कम मिळवण्याची धडपड, तर दुसरीकडे परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुरू असलेल्या युक्त्या आणि त्यातून निर्माण होणारे भन्नाट प्रसंग यामुळे ‘अफरातफरी’चा गोंधळ आता आणखी गुंतागुंतीचा होताना दिसतो. पैशांच्या हव्यासापायी तीन भावांमध्ये नेमकं काय घडतंय? तिघेही एकाच दिशेने धावतायत की प्रत्येकाचा वेगळाच डाव आहे? हे प्रश्न ट्रेलरनंतर अधिकच गडद होतात.

विशेष म्हणजे, ट्रेलर कथेतल्या अनेक गोष्टींचे संकेत देतो, मात्र त्यांची उत्तरं मात्र दडवून ठेवतो. तात्यांच्या मृत्यूमागचं खरं सत्य काय? एक कोटींची पॉलिसी खरंच भावांच्या हातात येणार का? पैशांसाठी सुरू झालेली धावपळ शेवटी कुठे जाऊन थांबणार? आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. विनोद, गैरसमज, पैशांचा मोह आणि तीन भावांची धडपड यांची धमाल सांगड ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

कलाकारांच्या संवादातून आणि प्रसंगांमधून निर्माण होणारा विनोद कथेतल्या गोंधळाला अधिकच मजेशीर बनवतो. मात्र या सगळ्या हास्याच्या आड एक कोटींची रक्कम नेमकी कुणाच्या पदरात पडणार? हा प्रश्न कायम राहातो.

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “टिझरमधून आम्ही ‘अफरातफरी’ची सुरुवात दाखवली होती, तर ट्रेलरमधून या गोंधळामागची खरी गंमत आणि पात्रांची धावपळ थोडी अधिक उलगडते. एक कोटी रुपयांची रक्कम ही या कथेतील प्रत्येकाच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येक पात्राला वाटतंय की आपला डाव बरोबर आहे, पण या सगळ्या डावपेचांचा शेवट नेमका कुठे होतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे एक कोडं म्हणून पाहावं, कारण पुढच्या क्षणी काय घडेल, याचा अंदाज लावणं तितकंच मजेदार आहे. या गोंधळात प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे