मयूरी साहाने महान संगीतकार ए. आर. रहमान यांना प्रभावित केले
तीन आठवड्यांतच इंडियन आयडॉलमधल्या मयूरी साहाने महान संगीतकार ए. आर. रहमान यांना प्रभावित केले
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वरील इंडियन आयडॉल 15 मधल्या टॉप 15 स्पर्धकांनी बादशाह, श्रेया घोषाल आणि विशाल ददलानी या तिन्ही परीक्षकांना आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सेसने प्रभावित केले आहे. या स्पर्धकांपैकी एक आहे, टॉलीगंज, कोलकाताहून आलेली ‘आयडॉल की क्लासिक क्वीन’ मयूरी साहा. मयूरीने महान संगीतकार ए. आर. रहमानचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने मयूरीने गायलेले त्याचे गाणे पोस्ट करून इन्स्टाग्रामवर तिला फॉलो केले आहे.
या कौतुकामुळे आनंदित झालेली मयूरी साहा म्हणते, “मी लहान असल्यापासून ए. आर. रहमान सरांना आदर्श मानले आहे आणि आता सोशल मीडियावर ते मला फॉलो करत आहेत, हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. हे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि माझ्या परिश्रमाला मिळालेली पावती आहे.”
ऑडिशनपासून मयूरीचे वेगळेपण ठळकपणे जाणवणारे होते. श्रेया घोषालचा प्लॅटिनम माइक तिला मिळाला होता. आमी जे तोमार 3.0 चे क्लासिकल बीटबॉक्स फ्यूजन गाऊन तिने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. तिचा हा प्रवास देशातील संगीत रसिकांना प्रेरणा देणारा आहे.
बघत रहा, इंडियन आयडॉल 15 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!