अमिताभ बच्चन यांनी सांगितले के ते अल्लू अर्जुनचे मोठे चाहते आहेत
कौन बनेगा करोडपती 16
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती सीझन 16’ मध्ये या आठवड्यात ‘इंडिया चॅलेंज वीक’ च्या रूपाने एक रोमांचक ट्विस्ट आला. या आठवड्यात 10 प्ले-अलॉन्ग स्पर्धक फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट (FFF) राऊंडमध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. त्यातील सर्वोत्तम 2 स्पर्धक ‘जल्दी 5 बझर राऊंड’ मध्ये जातील, जेथून त्यांना हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकते. बझर चॅलेंजचा विजेता खेळ पुढे चालू ठेवेल. मनी ट्रीमध्ये तो थेट सहाव्या प्रश्नावरून सुरुवात करेल. इंडिया चॅलेंज वीक मधील एक ठळकपणे उठून दिसलेली स्पर्धक होती, कोलकाताहून आलेली रजनी बर्नीवाल. जी उत्साही गृहिणी आणि घरच्या घरी शिकवणी घेणारी शिक्षिका आहे. या खेळात जिंकून मिळालेल्या रकमेतून किंडर गार्टन स्कूल उघडण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची तिची इच्छा आहे.
या भागात अमिताभ बच्चन म्हणाले की, “कम्प्युटरजींनी मला सांगितले आहे की, तुम्हाला अल्लू अर्जुन फार आवडतो.” त्यावर रजनीने उत्तर दिले, “सर, मला अल्लू अर्जुन आणि तुम्ही, दोघेही खूप आवडता.” त्यावर बिग बी हसून म्हणाले, “आता माझे नाव घेऊन काही उपयोग नाही!”
श्री. बच्चन पुढे म्हणाले, “अल्लू अर्जुन एक अद्भुत, प्रतिभावान कलाकार आहे. त्याला जी प्रसिद्धी मिळाली आहे, ती त्याने आपल्या पात्रतेने मिळवली आहे. मी सुद्धा त्याचा मोठा फॅन आहे. त्याचा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि जर तुम्ही तो अजून बघितला नसेल, तर जरूर बघा. पण माझी त्याच्याशी तुलना करू नका.”
तरीही रजनीने पुन्हा आपला मुद्दा पुढे केला की, त्या दोघांमध्ये काही तरी साम्य आहे. बिग बींनी विचारले, “काय साम्य आहे?” त्यावर रजनीने चटकन उत्तर दिले, “तुमची दोघांची स्टाइल बरीचशी सारखी आहे. तुम्ही जेव्हा कॉमेडी दृश्य करता, तेव्हा आपली कॉलर चावता आणि डोळे मिचकावता!” बिग बींनी हसत हसत विचारले, “कोणत्या चित्रपटात मी असं केलं आहे बरं?” रजनीने लगेच उत्तर दिले, “अमर अकबर अँथनीमध्ये! तुम्हा दोघांत आणखी एक साम्य आहे. तुमच्या दोघांचे आवाज दमदार आहेत. तुम्हाला भेटण्याचे माझे स्वप्न तर पूर्ण झाले, आता फक्त अल्लू अर्जुनला भेटायचे राहिले.”
बघा इंडिया चॅलेंजर वीक, होस्ट अमिताभ बच्चनच्या संगतीत ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!