Breaking
कृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगसामाजिक

अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच द्राक्षेमणी विक्रीस आणावेत

सदस्य भीमराव काळे यांचे आवाहन

0 3 2 1 2 1

स्पर्धात्मक बाजारभाव मिळणेसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच द्राक्षेमणी विक्रीस आणावेत 

शरद लोहकरे, लासलगांव

निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणाऱ्या द्राक्षेमण्यांना योग्य बाजारभाव मिळणेसाठी शेतकरी बांधवांनी त्यांचे द्राक्षेमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्रीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे यांनी खानगांव नजिक व उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.

प्रारंभी श्री. काळे यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्‌चे विधीवत पुजन करण्यात आले. खानगांव नजिक येथे मुहूर्तावर श्री. आकाश भोसले यांचा द्राक्षेमणी रू. 21/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 228 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 04/- ,जास्तीत जास्त रू. 25/- ,सरासरी रू. 19/- प्रति किलो याप्रमाणे होते.

तसेच उगांव येथे मुहूर्तावर श्री. लहु कडाळे यांचा द्राक्षेमणी रू. 61/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 160 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 07/-, जास्तीत जास्त रू. 61/-, सरासरी रू. 21/- प्रति किलो याप्रमाणे होते.

लिलाव शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून खानगांव नजिक व उगांव खरेदी-विक्री केंद्राची माहिती दिली. त्यानंतर श्री. काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, खानगांव नजिक व उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. 02 फेब्रुवारी, 2009 पासुन खानगांव नजिक व दि. 26 जानेवारी, 2004 पासुन उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली आहे. गेल्या 20 ते 21 वर्षात या केंद्रांस शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे द्राक्षेमण्यांची खरेदी करीत असे. स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लुट तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असे. त्यामुळे बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खानगांव नजिक व उगांव येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन दोन ते अडीच कोटी रूपयांची उलाढाल होते. खानगांव नजिक केंद्रावर सन 2009 ते 2024 पर्यंत 06 लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 16.50 कोटी रूपयांची उलाढाल याठिकाणी झाली आहे. तर उगांव केंद्रावर सन 2004 ते 2024 पर्यंत 17 लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 42 कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता सदर खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी विक्रीस प्राधान्य देतात.

यावेळी बाजार समितीचे सदस्य प्रविण कदम, माजी सदस्य पोपटराव रायते यांनी मनोगत व्यक्त करून बाजार समितीच्या सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, खडक माळेगांव सोसायटीचे व्हा. चेअरमन नितीन रायते, उगांव ग्रामपंचायतीचे सदस्य केदु पानगव्हाणे, ह. भ. प. शाम महाराज गांगुर्डे, रामभाऊ आवारे, चंद्रकांत गारे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, पंकज होळकर, द्राक्षेमणी खरेदीदार प्रमोद राठी, कृष्णा मापारी, दिलीप साबळे, पतींग ढोमसे, रावसाहेब घुमरे, प्रकाश साबळे, अरूण निकुंभ, शशिकांत शिरसाठ, किरण वाढवणे, दत्ता मापारी, एकनाथ आहेर, विजयानंद घोरपडे, विष्णुपंत गायकर, रोशन जेऊघाले, सचिन देशमुख, गोरख मापारी, काका मापारी, अतुल घुमरे, खंडेराव गांगुर्डे, बी. डी. ढोमसे, गोरख मापारी, नवनाथ मापारी, मोहन ढोमसे, शांताराम चव्हाण, बाळाजी साबळे, राजु साबळे, विष्णु पानगव्हाणे, संतोष साबळे, बुध्देश्वर साबळे, धनंजय चव्हाण, शांताराम चव्हाण, संतोष पानगव्हाणे, उमेश मेधने, इम्रान सैय्यद, खानगांव नजिक खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संतोष पोटे, उगांव खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी सागर कुऱ्हाडे, सचिन वाघ, सागर खुटे, तुषार शेजवळ, अक्षय पानगव्हाणे, संदीप वाघ, सुशिल जोशी यांचेसह परीसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे