ब्रेकिंग
जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम; ‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’चेही उद्घाटन

0
4
6
1
9
7
*जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम; ‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’चेही उद्घाटन*
नाशिक, १२ मार्च :
जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विपुल गट्टाणी, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. इरावती वाघमारे, युरोलॉजिस्ट डॉ. श्याम तलरेजा तसेच सीव्हीटीएस तज्ज्ञ डॉ. प्रणव माळी उपस्थित होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनीचे आजार वाढण्यामागील कारणे, त्यांचे निदान आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. विपुल गट्टाणी यांनी सांगितले की, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे न दिसल्यामुळे अनेकदा उशिरा लक्षात येतात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. इरावती वाघमारे यांनी किडनीच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि अनावश्यक औषधांचा वापर टाळणे या गोष्टी किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहेत.
डॉ. श्याम तलरेजा यांनी किडनीशी संबंधित शस्त्रक्रिया आणि युरोलॉजिकल आजारांबाबत माहिती देत सांगितले की, किडनी स्टोन, मूत्रमार्गातील अडथळे किंवा इतर समस्या वेळेवर ओळखून योग्य उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.
याप्रसंगी रुग्णांच्या किडनीच्या आरोग्याची नियमित तपासणी सुलभ व्हावी यासाठी ‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’ चेही उद्घाटन करण्यात आले. या विशेष पॅकेजमध्ये CBC, Serum Creatinine, Serum Uric Acid, Urine Routine या महत्त्वाच्या तपासण्या तसेच नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला अवघ्या रु. ४९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना किडनीच्या आरोग्याची वेळेवर तपासणी करणे अधिक सोपे होणार आहे.
यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,
“किडनीचे आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढत जातात. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाद्वारे नागरिकांमध्ये किडनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. तसेच ‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’च्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक तपासण्या सुलभ आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
जागतिक किडनी दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन नियमित तपासणी, निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीशी संबंधित आजारांचे निदान, डायलिसिस सुविधा, शस्त्रक्रिया तसेच तज्ज्ञ उपचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध आहेत.
0
4
6
1
9
7


