Breaking
आरोग्य व शिक्षण

उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक काळजी

– डॉ. इरावती वाघमारे (किडनीविकार तज्ञ) यांचे मार्गदर्शन

0 4 2 9 5 7

उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्यासाठी आवश्यक काळजी – डॉ. इरावती वाघमारे (किडनीविकार तज्ञ) यांचे मार्गदर्शन

तीव्र उन्हाळा आणि वाढते तापमान यामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते, ज्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागातील तज्ञांनी आवाहन केले आहे.

किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे, पाण्याचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि रक्तातील क्षारांचे प्रमाण योग्य राखणे अशी महत्त्वाची कार्ये पार पाडते. मात्र, उन्हाळ्यात निर्जलीकरण (Dehydration) झाल्यास किडनीवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे तिच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

उन्हाळ्यात किडनीचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करताना डॉ. इरावती वाघमारे सांगतात:
– पुरेसे पाणी प्या: दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागण्याची वाट पाहू नका.
– ओआरएस, लिंबूपाणी किंवा ताक यांचे सेवन करा: उष्णतेमुळे शरीरातील क्षार कमी झाल्यास ते भरून काढण्यास मदत होते.
– जास्त उन्हात फिरणे टाळा: विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
– ताजे व पौष्टिक अन्न खा: फळे, भाज्या, सॅलड आणि नारळपाणी यांचा आहारात समावेश करा.
– जंक फूड व जास्त मीठ टाळा: जास्त मीठ किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करते.
– वेदनाशामक औषधांचा (Painkillers) अति वापर टाळा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नियमितपणे घेऊ नका.
– मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवा: यामुळे किडनीचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
– लघवीचा रंग तपासा: गडद पिवळी लघवी हे निर्जलीकरणाचे लक्षण असू शकते.

तसेच पुढे माहिती देताना डॉ. वाघमारे यांनी नमूद केले की, पायांना सूज येणे, चेहरा फुगणे, लघवी कमी होणे किंवा जास्त प्रमाणात होणे, लघवीत रक्त जाणे, तीव्र अशक्तपणा यापैकी कुठली लक्षणे आढळल्यास त्वरित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ञ यांना भेटावे.

“किडनी आजाराची लक्षणे अनेकदा उशिरा दिसतात, त्यामुळे नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. क्रिएटिनिन (Creatinine) आणि GFR या साध्या रक्ततपासण्यांमधून किडनीचे आरोग्य समजू शकते,” असे डॉ. इरावती वाघमारे यांनी सांगितले.

नागरिकांनी उन्हाळ्यात किडनीच्या आरोग्याबाबत सजग राहावे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ञांकडून करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे