दिल्लीच्या सलोनी साजची बाजू घेत विशाल ददलानी म्हणाला, “जनता गाढव आहे”
भारताचा लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल, देशातल्या प्रतिभावंतांचा शोध घेण्यासाठी आपला 15 वा सीझन घेऊन लवकरच येत आहे. ऑडिशनमध्ये असे अनेक स्पर्धक पुढे आले, ज्यांचे गायन कौशल्य तर वाखणण्याजोगे होतेच, पण त्यांची कहाणीही प्रेरणादायक होती. अशीच एक असामान्य गुणवत्तेची स्पर्धक म्हणजे दिल्लीहून आलेली, उत्तम आवाजाची देणगी लाभलेली आणि विशिष्ट व्यक्तिमत्वाची, 23 वर्षांची सलोनी साज. ‘धन धना धन गोल’ चित्रपटातील ‘बिल्लो रानी’ गीतावरचा तिचा परफॉर्मन्स पाहिल्यावर परीक्षकांना तिच्या आगळ्यावेगळ्या आणि काहीशा घोघऱ्या आवाजाची दखल घ्यावीच लागली.
सलोनीने सांगितले की तिचा आवाज पुरुषी असल्याची टीका नेहमीच तिच्यावर होते. सोशल मीडियावरच्या टिप्पण्या देखील बहुधा नकारात्मकच असतात. हे ऐकल्यावर संतापलेला विशाल म्हणाला, “लोक गाढव आहेत. काही लोकांना हे कधीच समजणार नाही, पण जे लोक संगीत क्षेत्रात आहेत, ज्यांना गाणे समजते त्यांना नेहमीच तुझ्या आवाजाचे कौतुक वाटेल. आणि आम्ही तर वेगळेपणा आणि विशेष ओळख असलेला आवाज शोधत असतो. तुझ्या आवाजाला योग्य दिशा मिळत नाही, तोपर्यंत कुणाला तो भावणार नाही, पण असेही अनेक लोक आहेत, जे तुला योग्य दिशा दाखवू शकतील, त्यामुळे तू काळजी करू नकोस.”
हा व्हिडिओ येथे बघा: https://www.instagram.com/reel/DA-FFhXPtQf/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
श्रेया घोषालने देखील तिचे कौतुक करताना म्हटले, “आबिदा परवीन आणि उषा उथुपला लोकांनी ऐकले नाही का?”
सलोनीने सांगितले की, तिचा आवाज रातोरात बदलला; 2 वर्षांपूर्वी तिला एकदा रात्री जाग आली आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिचा घसा दुखत होता. तिचे वडील तिला दवाखान्यात घेऊन गेले. काही टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, सलोनीच्या घशात गाठ आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्या प्रक्रियेनंतर काही आठवडे तर ती आपला आवाजच गमावून बसली होती. मात्र त्यानंतर तिच्या वडीलांनी तिला प्रोत्साहन दिले आणि तिला बरे व्हायला मदत केली.
तरी, प्रश्न राहतोच: ती पुढच्या फेरीत जाणार का? आणि गोल्डन तिकीट जिंकणार का?
सलोनीचा सांगीतिक प्रवास उलगडताना बघण्यासाठी बघत रहा इंडियन आयडॉल सीझन 15.