कु. दुर्गा गुंजाळने थायलंड येथील स्केटिंग मध्ये फडकविला भारताचा झेंडा
सरस्वती विद्यालय लासलगावच्या कु. दुर्गा गुंजाळने थायलंड येथील स्केटिंग मध्ये फडकविला भारताचा झेंडा
शरद लोहकरे, लासलगाव..
सरस्वती विद्यामंदिर लासलगावची विद्यार्थिनी आणि जय जनार्दन आश्रमाचे संचालक श्री. व सौ. गुंजाळ यांची कन्या दुर्गा दिलीप गुंजाळ हिने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत दोन ब्रांझ व एक सिल्वर मेडल मिळविले. या स्पर्धेत थायलंड, केनिया, श्रीलंका, सौदी, यु.एस.ए, अफगाणिस्तान, दुबई आदी देशातील स्पर्धक सहभागी होते. या सर्व खेळाडू पेक्षा सरस कामगिरी करत दुर्गा ने भारताची मान उंचविलाआंतरराष्ट्रीय स्तरावर उंचविली.
दुर्गा बालपणापासून स्केटिंग स्पर्धेत विविध स्तरावर सातत्याने यश मिळवत आहे, या स्पर्धेने तिने आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. दुर्गाचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे संस्थेचे अध्यक्ष जगदीश होळकर, उपाध्यक्ष सुलेमान मुलानी, सचिव गुणवंत होळकर, सदस्य बाळासाहेब बोरसे, सुनील शिंदे,संजय डागा, डॉ. विकास चांदर, मुख्याध्यापक भीमराव शिंदे, राजेंद्र महाले सर्व शिक्षक वृंद आणि पालकांनी अभिनंदन केले तसेच परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.