Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरसामाजिक

अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या 25 मिनीमली इन्वेंसीव्ह कार्डियाक सर्जरी पूर्ण – रुग्णसेवेचा एक नवा टप्पा

0 3 2 9 4 9

नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कार्डिओ व्हॅस्क्युलर व थोरॅसिक सर्जन डॉ. प्रणव माळी ( MBBS ,MS, M.ch,-CVTS) यांनी मिनीमली इन्वेंसीव्ह कार्डियाक सर्जरी या अत्याधुनिक शस्त्रक्रियेचा यशस्वी टप्पा पूर्ण करत 25 रुग्णावर यशस्वी सर्जरी केली आहे. या यशाचा सन्मान करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमात हॉस्पिटलच्या विविध विभागांचे मान्यवर, कार्डिओलॉजी टीम तसेच शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णांनी सहभाग घेतला यावेळी डॉ. प्रणव माळी यांनी (MICS) सर्जरी विषयी माहिती देताना सांगितले की, “ही पद्धत पारंपारिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेत खूपच फायदेशीर आहे यात छातीत फक्त लहान चिरा घेऊन शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे वेदना कमी रक्तस्राव कमी आणि रुग्ण लवकर बरा होतो ही पद्धत प्रौढांबरोबरच मुलांनाही लागू शकते. विशेष म्हणजे, अशा पद्धतीने केलेले आमचे सर्वात लहान बाळ केवळ दीड वर्षाचे होते ज्याचे वजन 9 किलो होते या शस्त्रक्रियेचे दाग दिसत नाहीत त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या दृष्टीने ही पद्धत अधिक चांगली मानली जाते बायपास सर्जरी, वॉल्व रिप्लेसमेंट आणि वॉल्व रिप्लेसमेंट सर्जरीसाठी ही पद्धत प्रभावी ठरते विशेषतः लहान मुलांमध्ये हृदयदोषांची दुरुस्ती देखील अत्यल्प वेदनांचा शक्य होते.”

या विशेष कामगिरीमध्ये अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे ज्येष्ठ भूलतज्ञ डॉ. संदीप भंगाळे, डॉ. शर्वरी माळी आणि डॉ. मंदार गलांडे यांचे विषय सहकार्य लाभले. ज्यामुळे ही सर्जिकल प्रक्रिया अधिक सुरक्षित व परिणामकारक ठरली.

याप्रसंगी हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर श्री नीरजलाल यांनी सांगितले की, “अशोका मेडिकलवर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व सर्वाधिक तांत्रिकदृष्ट्या सुसज्य वैद्यकीय केंद्र आहे तेथे अत्याधुनिक उपकरणासह तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध हृदय विकारावरील उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अशोका मेडिकल हॉस्पिटल मध्ये हृदयाशी संबंधित प्रक्रिया व शस्त्रक्रिया जसे की अँजिओग्राफी, अँजीओप्लास्टी, बायपास सर्जरी, वॉल्व रिप्लेसमेंट या गरजू रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत केल्या जातात.” 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड श्री शिवकुमार रोहाडे यांनी केले. तसेच केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे रुग्णांचे तसेच उपस्थित पत्रकार बंधूंचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केले. 

अशोका मेडिकल हॉस्पिटल हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अनुभव डॉक्टर व रुग्णभिमुख दृष्टिकोन यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे