Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री महावीर विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग निफाड तर्फे सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!

0 4 2 9 4 9

ऋषिकेश जोशी, लासलगाव ता.निफाड
दि.17/07/2025

लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग निफाड तर्फे हरित कुंभ 2025 संकल्पना अंतर्गत सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, सामाजिक वनीकरण विभाग निफाडचे वनमंडळ अधिकारी प्रवीण राऊत, संस्थेचे पालक प्रतिनिधी व वृक्षप्रेमी अक्षय ब्रम्हेचा यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास वनमंडळ अधिकारी नवनाथ गांगोडे, वनपाल एन. एन. गांगुर्डे, वनरक्षक के. डी. पाईकराव, खैरनार साहेब, सखी सावित्री मंच सदस्या डुंबरे मॅडम,लासलगाव ग्रामपालिकेचे ग्रामसेवक बाविस्कर साहेब,प्राचार्या पल्ल्वी चव्हाणके, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, हरीतसेना प्रमुख विजय कुंदे, हरितसेना लासलगावचे सदस्य ऋषिकेश जोशी,चंद्रशेखर शिंदे, राजेंद्र होळकर, पियुष भन्साळी, बाबा गीते तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित सर्वांनी ” माझा कुंभ माझी जबाबदारी, माझा वृक्ष माझी जबाबदारी ” घोषणा दिल्या . यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात 61 वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. वृक्षरोपणासाठी लासलगाव ग्रामपालिका, हरितसेना लासलगाव यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाचे संस्थेचे खजिनदार अजय ब्रम्हेचा, संचालक मोहनलाल बरडिया, महावीर चोपडा, अमित जैन, सुनिल आब्बड यांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे