Breaking
अपघात

अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

0 3 2 1 2 3

नाशिक/प्रतिनिधी -: दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक, मुलगा व पत्नी रस्त्यावर पडले असता महिलेच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक येथे घडली.


मेरी लिंक रोड, पंचवटी, नाशिक. बली महाराज मंदिर ते मेरी जोडणार्‍या रस्त्यावर निर्मल नगर पोलिस चौकी समोर सुमारे रात्री 9.30 वा. दुचाकी (MH 15 GW 4375) ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक त्यांचा मुलगा व पत्नी रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडलेल्या महीलेच्या अंगावरून अज्ञात वाहन चालून गेल्याने महिलेचा मत्यू होऊन मृतदेह छिन्न भिन्न झाला. घटना स्थळी मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून पोलिस काळजी घेत होते, शववहिका 10.30 वा. मृतदेह पुढील कारवाही साठी सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे घेऊन गेली. परिसरातील नागरीक घडलेल्या हृदय पिळवटून टाकनार्‍या या घटने बद्दल हळहळ व्यक्त करत होते.मेरी लिंक रोड या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये जा होत असते, बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे वाहन चालक, भाजीपाला मार्केटला जाणारे वाहन अतिशय बेदारकपणे वाहन चालवत असतात, सदोष रस्ता दुभाजकामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अजून अरुंद झाला आहे, नेहमीच भरधाव जाणारे वाहन या रस्ता दुभाजकाला आदल्याच्या घटना घडत असतात. रस्ता दुभाज कावर लावलेले पथ दिप ना दुरुस्त आहेत. परिसरातील रहिवासी नेहमी अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी अशी मागणी करत असतात, वारंवार मागणी करून ही या रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार नाशिक महानगर पालिका बंद करत नाही. या आधी ही असले अपघात झाले आहेत यातून प्रशासन काही बोध घेत नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे