ग्रामविकास योजनांच्या निधीचा अपहार
निमगाव मढ ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

लक्ष्मण घुगे, राजापूर…
येवला तालुक्यातील निमगाव मढ ग्रामपंचायत मध्ये 75 लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच सौ मनीषा नवनाथ लबडे व ग्रामसेवक महेश रामदास महाले यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात अजून काही ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची अपहरण झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे याची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे. येवला तालुक्यातील निमगाव मड ग्रामपंचायत नेहमी तालुक्यात चर्चेत असून एकमेकांचे विरोधक तक्रार करण्यासाठी नेहमी सज्ज राहत होते त्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
या ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सौ मनीषा नवनाथ लबडे व ग्रामसेवक महेश महाले यांनी संगमत करून ग्रामनिधी पाणीपुरवठा योजना 14 वित्त आयोग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या योजना अंगणवाडी बांधकाम यासारख्या ग्रामविकासासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या दुरुपयोग केला आहे. या योजनेतून आपल्या अधिकार्याचा वापर करत तब्बल 75 लाख 17 हजार 95 रुपयांच्या निधीच्या अपहार केल्याची तक्रार येवला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भरत मोहिते यांनी येवला तालुका पोलिसात दिली आहे यानुसार तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिकयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे