Breaking
क्रिडा व मनोरंजन

जिल्हास्तरीय 17 वर्षातील (सब ज्युनिअर) टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवड चाचणी*

0 3 2 1 2 3

नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनवतीने 4 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी सकाळी 10 वाजता दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे 17 वर्षातील मुल व मुली संघांची जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा संघ सहभागी होत आहे. यासाठी 4 ऑगस्ट (रविवार) रोजी सकाळी 10 वाजता 17 वर्षातील ( सब ज्युनिअर ) टेनिस क्रिकेट खेळाडूंनी आपल्या किटसह व या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंचा जन्म 01 जानेवारी 2008 या त्या नंतरचा असावा. जन्म पुराव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजी व मराठी मध्ये असलेल्या जन्मतारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. कृपया याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.

या चाचणी स्पर्धेसाठी प्रत्येकी तिनेशे रुपये फी तसेच रजिस्ट्रेशन फी वेगळी आकारली जाणार आहे. राज्यस्तरीय मुले व मुली टेनिस क्रिकेट स्पर्धा बारामती ( पुणे) येथे 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे तरी 17 वर्षातील (सब ज्युनियर ) तील खेळाडूनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव व नाशिक विभाग अध्यक्ष विलास गायकवाड (9921133303) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी टेनिस क्रिकेट प्रशिक्षक धनंजय लोखंडे (9673715195) , यांच्याशी संपर्क साधावा ..

5/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे