सैनिकी वसतिगृहात प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत
- जिल्हा सैनिक अधिकारी निवृत लेफ्प्टनंट कमांडर ओंकार कापले
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : नाशिक येथील सैनिक मुलां/ मुलींचे वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाबाबात अर्ज व माहिती पत्र वसतिगृहाच्या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक माजी सैनिक, वीरपत्नी, सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी वसतिगृह अधीक्षक / अधीक्षिका यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज 30 जून 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी निवृत लेफ्प्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर प्रवेशासंबधी वसतिगृह व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन सैनिकी मुलांचे वसतिगृह, शासकीय दूध डेअरी समोर, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे गुरूवार 4 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
या बैठकीस प्रवेश घेणाऱ्या पाल्यांनी व पालकांनी नियोजित दिनांकास व वेळेत हजर रहावे. बैठकीस येतांना माजी सैनिक व वीरपत्नी यांनी सैन्यातील कागदपत्रे (Discharge Book, EX-serviceman/ widow Identity card, ECHA card etc.) सोबत आणावे, असेही जिल्हा सैनिक अधिकारी निवृत लेफ्प्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000