क्रिडा व मनोरंजनधार्मिकसामाजिक
निफाड ते पंढरपूर सायकल वारीसाठी ४० सायकलिस्ट सज्ज

0
4
7
6
2
2
निफाड ते पंढरपूर सायकल वारीसाठी ४० सायकलिस्ट सज्ज ; दि १० जुलैला श्री विठ्ठल मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रस्थान
किरण कुमार आवारे…
शिरवाडे वाकद :- वारकरी परंपरेसोबत पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि सायकलिंग संस्कृतीचा संदेश देणारी निफाड ते पंढरपूर सायकल वारी यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. निफाड सायकलिस्टच्या वतीने आयोजित या वारीत यावर्षी सुमारे ४० सायकलिस्ट सहभागी होणार असून ते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांसह पंढरपूरची वारी पूर्ण करणार आहेत.
या सायकल वारीला शुक्रवार, दि. १० जुलै रोजी पहाटे ५ वाजता निफाड येथील श्री विठ्ठल मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. वारीचा पहिला मुक्काम अहिल्यानगर येथे राहणार असून, शनिवार, दि. ११ जुलै रोजी सायकलिस्ट पंढरपूर येथे पोहोचतील. वारी निमित्त रविवार, दि. १२ जुलै रोजी राज्यभरातील हजारो सायकलिस्ट पंढरपुरात आयोजित भव्य सायकल रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात निफाड सायकलिस्टचे सदस्यही उत्साहाने सहभागी होत वारकरी परंपरेला आधुनिक आरोग्यदायी जीवनशैलीची जोड देण्याचा संदेश देणार आहेत. या वारीची तयारी गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू होती. सहभागी सदस्यांनी दर रविवारी भद्रा मारुती, चांदवड – वडबारे, पाटणादेवी, सापुतारा आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या सराव फेऱ्या पूर्ण करून शारीरिक तंदुरुस्ती व सहनशक्ती वाढविण्यावर भर दिला.
सायकल वारीच्या यशस्वी नियोजनासाठी अध्यक्ष पांडुरंग कडवे, उपाध्यक्ष संदीप गवळी, सचिव दिपक बोरसे तसेच संचालक दिपक घंगाळे, राजू गवळे, शेखर बागडे, पूजा मगर, मनिषा वाघ आणि आरती मोगल यांनी विशेष परिश्रम घेतले असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
धार्मिक परंपरेसोबत पर्यावरणपूरक वाहतूक, आरोग्याविषयी जनजागृती आणि सायकलिंग संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.
0
4
7
6
2
2



