आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिकसामाजिक
अबॅकसचे आणि वैदिक मॅथ परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

0
2
5
5
5
9
अबॅकसचे आणि वैदिक मॅथ परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
लासलगाव – येथील रेणुकाजी टॅलेंट टुटर्स मध्ये शिकत असलेल्या विविध विद्यार्थ्यांनी आय जिनीयस अकॅडमी परिक्षेत प्रथम स्तरावर प्रावीण्य मिळविल्या बद्दल संचालिका संगीता जगताप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदके आणि प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला.
अबॅकसचे आणि वैदिक मॅथचे सध्याच्या स्पर्धात्मक युगात खुप जास्त फायदे आहेत. प्राचीन भारतीय पद्धती गणित कसं काम करते याचा समावेश यात असतो. त्यामुळे आकडेमोड सोपी आणि जलदगतीने होतेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावर ताण न पडल्याने ते सतत ताजेतवाने व कार्यक्षम राहतात. आजच्या आपल्या स्पर्धात्मक युगातला स्पर्धा परिक्षांमधे विशेषतः गणित सोडविताना याचा उपयोग खुप महत्त्वाचा ठरतो. या अबॅकसचे आणि वैदिक मॅथचे प्रशिक्षण संचालिका संगीता जगताप या विद्यार्थांना देत असतात.
या गुणगौरव कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजनाने झाली. संदीप घायाळ सर हे अध्यक्षस्थानी होते तर वैशाली निकम मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या मान्यवरांसह व्यासपीठावर उपस्थित यशवंत वाणी, गायकवाड सर, मोनाली कांबडे, ऋषीकेश जोशी यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षकांनी विचारलेल्या अंकगणित आकडेमोड प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांनी अगदी काही क्षणात देऊन अबॅकसचे प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सेना महाराज मंदिर विश्वास्तांचे तसेच दिलीप जगताप, पुजा सोनी, राहुल जगताप, प्रशांत गरड यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
2
5
5
5
9