व्ही. एन. नाईक एज्युकेशन शिक्षण संस्था निवडणूक निकाल जाहीर
यशवंतराव ताडगे, पळाशी –
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन शिक्षण सोसायटीच्या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही अटीतटी आरोप प्रत्यारोपाने गाजली.आज दिनांक 28 जुलै रविवार रोजी सकाळी मखमलाबाद लिंकरोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी साठ टेबलावर करण्यात आले होते.. सकाळी आठ वाजता मतदान मोजणीस सुरुवात झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस ,सहचिटणीस प्रत्येकी एक-एक जागेकरिता तर विश्वस्तासाठी सहा जागा निवडून द्यायच्या आहे. सदस्य म्हणून नाशिक गटातून 4, सिन्नर तालुक्यातून 3, येवला-मालेगांव तालुक्यातून 2, निफाड -चांदवड तालुक्यातून 3, नांदगाव ,बागलाण व कळवण गटात 2, दिंडोरी, पेठ ,व सुरगाणा गटात 3, स्त्री राखीव गटात 2 अश्या प्रकारे जागेसाठी मतदारांना 29 मते देण्याचा अधिकार आहेत. त्यासाठी येत्या 27 जुलै 2024 रोजी शनिवारी मतदान होणार आहे. 8000 सभासद असलेले संस्थेत शनिवारी 27 जुलै रोजी 88.87 टक्के मतदान झाले होते.
कोंडाजी (मामा) आव्हाड यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या सहपरिवर्तन पॅनल ची निर्मिती केली आहे. तर विद्यमान सरचिटणीस तानाजी जायभावे आणि सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रगती पॅनल ची निर्मिती केली आहे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी माजी माहिती संचालक शिवाजी मानकर, कमलेश बोडके यांच्या सह क्रांतिवीर विकास पॅनल तर मनोज बुरकुले यांनी माजी मंत्री कै. तुकाराम जी दिघोळे यांचे सुपुत्र अभिजीत दिघोळेसह नवउर्जा पॅनलची निर्मिती केली.
रात्री उशिरापर्यंत हातीआलेले निकाल असे.
विश्वस्त पदाचे विजयी उमेदवार- मानकर दामोदर (अण्णा) नारायण(2553), नागरे अशोक दामोदर(2106), सानप बबनराव दत्तात्रेय(2099) ,काकड नामदेव रामचंद्र (2068),काकड नारायण कारभारी(2049) हे प्रगती पॅनलचे चारही उमेदवार निवडून आले आहेत तर परिवर्तन पॅनलचे जायभावे लक्ष्मणराव (नाना) पंडितराव (2335) हे निवडून आले आहेत. एकूण वैध मते6677, एकूण अवैध मते229 आहेत.
विश्वस्त पदासाठी पराभूत उमेदवार झालेले
अँड. आंधळे विलास पांडुरंग(1764), कराड सुभाष नामदेव(1848) ,घुगे रमेशचंद्र त्र्यंबकराव(2027) ,चकोर बाळकृष्ण (बाळासाहेब) मुरलीधर(2043), ताडगे निलेश शंकरराव(390) ,नागरे विष्णू सुखदेव (495), पानसरे बुधाजी शंकर (1417) , पालवे नारायण भिकाजी (1845), फडे विठोबाराजे कारभारी (1359) ,बोडके उत्तमराव यशवंत(1395) ,डॉ. बोडके धर्माजी जयराम (1969) ,बोडके शोभा पांडुरंग (410), बोधले निवृत्ती दत्तात्रय (512), भाबड अरुण गंगाधर(285), वाघ बाळासाहेब नाना (1982), वाघ सोपान फकीरा(40), सानप बबनराव दत्तात्रय(2099),अँड. सानप रामनाथ कारभारी(1929), सोनवणे भास्कर बाबुराव (1599) ,सोनवणे ज्ञानेश्वर बाबुराव(388). नाशिक तालुका शहरासह इगतपुरी तालुक्यातून चार जागा निवडून द्यायच्या होत्या त्यातून कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून 17 जणांनी उमेदवारी केली होती त्यामधील विजयी उमेदवार- घुगे प्रकाश दत्तू(2541) ,काकड प्रल्हाद त्रंबक (2439), धात्रक बाळासाहेब संपतराव(2325) तीन जागा मिळवल्या आहेत. तर परिवर्तन पॅनलचे काकड गोकुळ केशव (2222)यांच्या रूपाने एक जागा मिळवली आहे.
पराभवी उमेदवार- आव्हाड धोंडीराम खंडेराव (1488),आव्हाड प्रमोद मधुकर (59), आव्हाड प्रशांत रामचंद्र(1429) ,आव्हाड विलास बाबुराव (1608), कांगणे बबन धोंडीराम(2067) ,काळे मनोहर विठोबा (376) ,गीते भाऊसाहेब परशराम(1912), गीते मिलिंद जगन्नाथ (322), घुगे सुरेश शिवाजी(1400), चकोर प्रकाश परशराम (342) ताडगे अजित सुखदेव (465) ,नागरे प्रकाश कारभारी (2029), सोनवणे माणिक निवृत्ती (2004). एकूण वैध मते 6635 तर एकूण अवैध मते 269.
सिन्नर विजय उमेदवार – आव्हाड जयंत दशरथ(2481) ,गायकवाड समाधान शांताराम(2473), नाईक हेमंत नारायणराव(2339) तीनही जागा प्रगती पॅनलने मिळवले आहेत. एकूण वैध मते 6619 तर एकूण अवैध मते 287.
पराभव उमेदवार – आव्हाड एकनाथ शिवराम (नाथा मामा)(1643), आव्हाड रमेश किसन (355), कातकडे सूर्यभान लक्ष्मण (358),गीते किरण देवराम(1980), ढाकणे शंकर बाबुराव (369),बोडके रामनाथ बबन(1518), सांगळे अमृतराव खंडेराव (1666), सांगळे भाऊसाहेब तुकाराम(1952) ,सानप काशिनाथ विठोबा(1920).हे पराभूत झाले आहेत.
प्रगती पॅनलचे सरचिटणीस पदी हेमंत आप्पा धात्रक विजयी, प्रगती पॅनलचे सहचिटणीस पदी दिंगबर नाना गिते विजयी परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष पदी कोंडाजी मामा आव्हाड विजयी, परिवर्तन पॅनलचे उपाध्यक्षपदीउदय घुगे विजयी, व्ही एन नाईक शिक्षण संस्थेवर हेमंत धात्रक यांच्या प्रगतीचा झेंडा तर कोंडाजी मामा आव्हाड यांच्या परिवर्तन पॅनल ला 4जागा सह अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड ,उपाध्यक्ष उदय घुगेहे निवडून आले. तर प्रगतीचे येवला तालुक्यातून संपत लक्ष्मण वाघ (2323) ,रमेश नामदेव वाघ (2337) तर निफाड मधून प्रगतीचे पुंजाहरी काळे (2504) वाघ , दराडे बंडनाना सहदू (2353), परिवर्तन उद्धव कुटे (2336), दिंडोरी – प्रगती चे राजेश प्रभाकर दरगोडे (2350),शरद लक्ष्मण बोडके(2593) परिवर्तन चे सुभाष आव्हाड(2304) महिला प्रतिनिधी प्रगती पॅनलचे नंदा बंडूनाना भाबड (2416) कातकडे रेखा रामप्रसाद (2551) ’हे विजयी झाले तर ,तर अध्यक्ष पदी कोंडाजी मामा आव्हाड ,उपाध्यक्ष उदय घुगे हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले. तर अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, (क्रांतिवीर पॅनल), प्रगती पॅनलचे तानाजी जायभावे, नव ऊर्जा पॅनलचे मनोज बुरकुले हे उभे होते.
परिवर्तन चे कोंडाजी मामा आव्हाड यांच्याकडून यांना पराभव पत्करावा लागला. तर उपाध्यक्ष पदासाठी परिवर्तन पॅनलचे उदय काका घुगे विजयी झाले त्यांनी क्रांतिवीर विकास पॅनलचे उमेदवार कमलेश बोडखे, व प्रगती पॅनलचे अँड पी.आर.गीते व नवऊर्जापॅनलचे जयसिंह सांगळे यांचा पराभव केला. तर सरचिटणीस पदासाठी उभे असलेले प्रगती पॅनलचे विद्यमान सरचिटणीस हेमंत आप्पा धात्रक हे विजयी झाले तर त्यांनी परिवर्तन पॅनलचे माजी आमदार बाळासाहेब सानप व क्रांतिवीर विकास पॅनलचे शिवाजी मानकर च नवऊर्जा पॅनलचे माजी राज्यमंत्री कै. तुकारामजी दिघोळे यांचे सुपुत्र अभिजित दिघोळेयांचा पराभव केला. सहचिटणीस पदासाठी प्रगती पॅनलचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिंगबर वाळू गीते हे विजयी झाले. त्यांनी परिवर्तन पॅनलचे अँड जयंत सानप व क्रांतिवीर विकास पॅनलचे एकनाथ दिघोळे ,नवऊर्जा पॅनलचे संदीप फड यांचा पराभव केला.
विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतिवीर व मनोज बुरकुले यांच्या व माजीमंत्री कै. तुकारामजी दिघोळे याचे सुपुत्र अभिजित दिघोळे यांच्या नवऊर्जा पॅनल तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व कोंडाजी मामा आव्हाड व माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले होते. क्रांतिवीर विकास पॅनलचे सत्ताधारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विद्यमान पंढरीनाथ थोरे व नवऊर्जा पॅनल चे मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांच्या पॅनलला एक ही जागा जिंकता आली नाही. त्यांचा सुफडा साफ केला. मतदारांनी त्यांना नाकारले.
यशवंतराव ताडगे, पळाशी –