Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

वंध्यत्व जनजागृतीसाठी ओएसिस जननी यात्रा नाशिकमध्ये दाखल; विविध समुदायांना मार्गदर्शन करणार

0 4 2 9 5 7

वंध्यत्व जनजागृतीसाठी ओएसिस जननी यात्रा नाशिकमध्ये दाखल; विविध समुदायांना मार्गदर्शन करणार

या देशव्यापी मोहिमेच्या माध्यमातून लोकांना तज्ज्ञांचा सल्ला, मोफत तपासणी तसेच विज्ञानावर आधारित मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार.

नाशिक, २३ फेब्रुवारी २०२६: पुनरुत्पादन औषधशास्त्र क्षेत्रातील देशातील विश्वसनीय कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या ओएसिस फर्टिलिटीने आपल्या ओएसिस जननी यात्रा या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा पुढचा टप्पा जाहीर केला. यंदाची ओएसिस जननी यात्र नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. टायर २ आणि ३ शहरांतील लोकांमध्ये वंध्यत्वाविषयी जागरुकता निर्माण करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे, वंध्यत्वाच्या प्राथमिक तपासणीची सुविधा पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेद्वारे समाजातील विविध स्तरांतील लोकांमधील संभ्रम दूर करुन त्यांना पालकत्वाच्या दिशेने योग्य पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

नाशिक येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाप्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती. हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर श्री. विलास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनीही हजेरी लावून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. ओएसिस फर्टिलिटीच्यावतीने लोकांना पुनरुत्पादन आरोग्याशी संबंधित मिळणारे मूलभूत शिक्षण, पुनरुत्पादन आरोग्याच्या प्रचारासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ याविषयी उपस्थित पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कंपनीने सामुदायिक स्तरावर आरोग्यविषयक जोरदार प्रचार केल्याने सर्वांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. वंध्यत्वासारख्या विषयावर समाजात सार्वजनिक पातळीवर चर्चा घडवून आणल्याबद्दल कंपनीचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

बदलती जीवनशैली, दिरंगाईने होणारे लग्न, वैज्ञानिक माहितीचा अभाव यांमुळे वंध्यत्वाच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. ही समस्या लक्षात घेत ओएसिस जननी यात्रा बसच्या माध्यमातून जोडप्यांना तज्ज्ञांकडून मोफत सल्ला दिला जातो. विविध चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. यात नमुना संकलन केंद्रांद्वारे (कलेक्शन झोन्स) मोफत एएमएच, वीर्य विश्लेषण आणि हिमोग्लोबिन तपासणीचा समावेश आहे. या केंद्रात जोडप्यांना वेळेवर अचूक आणि संवेदनशील मार्गदर्शन दिले जाते. नाशिक येथील यशस्वी यात्रेनंतर आता लासलगाव, मालेगाव आणि राज्यातील इतर भागांत यात्रेचा पुढील प्रवास सुरु राहील. अधिकाधिक लोकांपर्यत वंध्यत्वाविषयी जागरुकता आणि प्राथमिक तपासणीची सुविधा पोहोचवण्यासाठी ही यात्रा प्रयत्नशील राहील.

या प्रसंगी बोलताना नाशिक महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर-आडके यांनी ओएसिस जननी यात्रेमुळे समाजातील वंधत्वाच्या समस्येबद्दल माहिती देत या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. ‘‘ओएसिस फर्टिलिटी जननी यात्रा ही पुनरुत्पादन आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम आहे. पुनरुत्पादन आरोग्याची माहिती देणारी ही पहिलीच मोहिम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत उच्च दर्ज्याच्या सुविधा पोहोचवल्या जातात’’,असे सांगत त्यांनी राज्यातील घटत्या प्रजनन दराबद्दल चिंता व्यक्त केली. जनजागृती आणि उपचारांची मुलबक प्रमाणात सुविधा असल्यास वंध्यत्वाचा सामना करता येतो. ओएसिस जननी यात्र स्थानिक समुदायांपर्यंत थेट पोहोचते. कुटुंबांना याविषयी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. यामुळे सुदृढ भारताची निर्मिती होण्यास मदत होईल.’’ असेही त्या म्हणाल्या.

नाशिक महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री. विलास शिंदे यांनीही या उपक्रमाविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘’पुनरुत्पादन आरोग्य सेवांबाबतीत आज अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सामान्य लोकांना या आरोग्य सेवा मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ओएसिस फर्टिलिटीने सुरु केलेल्या या पथदर्शी उपक्रमातून सर्व स्तरांतील सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या लोकांना ही सेवा मिळायाला हवी. पुण्यात ही मोहिम यशस्वी ठरली. आता नाशिक येथेही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल. या मोहिमेतून सकारात्मक बदल घडतील. आम्ही या बदलांच्या प्रतीक्षेत आहोत.’’

ओएसिस फर्टिलिटीच्या सह-संस्थापिका आणि वैद्यकीय संचालिका डॉ. दुर्गा जी.राव म्हणाल्या, ‘‘विज्ञानामुळे वंधत्वावरील उपचारांमध्ये क्रांती घडली आहे. समाजातील तळागाळापर्यंतच्या सर्वांना अत्याधुनिक आणि पुराव्यांवर आधारित पुनरुत्पादन आरोग्य सेवेची माहिती द्यायला हवी. ओएसिस जननी यात्रा या उपक्रमातून पालकत्वाचा प्रवास सुरु करु इच्छिणा-या जोडप्यांना आता मदत मिळत आहे. जोडप्यांना घराजवळच योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परिणामी, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी होण्यासाठी मदत होईल. जोडप्यांना पालकत्वाचा प्रवास आत्मविश्वासाने सुरु करता येईल.’’

ओएसिस फर्टिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुष्कराज शेणई म्हणाले, ‘‘भारताचा प्रजनन दर आता कमी होऊ लागला आहे. याकरिता योग्य वेळी आणि सहज उपलब्ध होणारी पुनरुत्पादन आरोग्य सेवा ही पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाची ठरू लागली आहे. ही गरज ध्यानात घेता ओएसिस फर्टिलिटी या संस्थेमार्फत ‘गुड हँड्स ऑफ सायन्स’ या संकल्पनेचा सर्व स्तरावर प्रचार केला जात आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून लोकांना तज्ज्ञांच्या वतीने समुपदेशन, वेळेवर तपासणी आणि योग्य मार्गदर्शन दिले जाते. जेणेकरुन पालकत्वाची स्वप्ने पाहणारी जोडपी त्यांच्या उपचारांबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील.‘’

ओएसिस फर्टिलिटीच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ सल्लागार डॉ. पल्लवी उंटवाल म्हणाल्या, ‘‘ओएसिस जननी यात्रेला मिळत असलेला उत्सफूर्त प्रतिसाद पाहता, जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्याची आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाची गरज लक्षात येते. स्थानिक समुदायाला वेळेवर अचूक माहिती देणे आणि आवश्यक आधार देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजही अनेकांना वंध्यत्वाच्या समस्या समजून घेताना, अत्याधुनिक उपचारांची माहिती मिळवताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. या यात्रेमुळे संबंधित माहिती लोकांच्या घरापर्यंत योग्यरित्या पोहोचते. त्यांना हक्काचे मार्गदर्शन मिळते.’’

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे