Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

“माझे आजोबा राज कपूर साहब यांनी हा परफॉर्मन्स पाहिला असता, तर ते खूप खुश झाले असते.”- करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक निखिल पटनायकला दाद

0 1 5 1 2 2

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये स्पर्धक निखिल पटनायकला दाद देताना करिश्मा कपूर म्हणाली, “माझे आजोबा राज कपूर साहब यांनी हा परफॉर्मन्स पाहिला असता, तर ते खूप खुश झाले असते.”

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 तुमच्या वीकएंडला मस्त फिल्मी तडका देणार आहे. या वीकएंडचे एपिसोड्स प्रेक्षकांना आठवणींच्या दुनियेत घेऊन जातील कारण यावेळी थीम आहे, ‘ईराज ऑफ बॉलीवुड’. वेगवेगळ्या दशकात बॉलीवूडची स्टाइल कशी बदलत गेली हे आपल्या परफॉर्मन्समधून दाखवून स्पर्धक हिंदी सिनेमाला आदरांजली वाहतील. ENT स्पेशलिस्ट करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईससोबत या वीकएंडला सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू येणार आहे. थेट कृष्ण-धवल युगापासून ते 90च्या दशकाचे लोकप्रिय युग आणि आता मिलेनियमचे जोशपूर्ण युग असा बॉलीवूडचा प्रवास आपल्या डान्समधून दाखवून विविध डान्स शैली, संगीत आणि कोरिओग्राफीचे दर्शन आपले स्पर्धक प्रेक्षकांना घडवतील.

बिलासपूर, छत्तीसगडहून आलेला निखिल पटनायक आणि त्याचा कोरिओग्राफर आशुतोष पवार प्रेक्षकांना 1970 च्या सुवर्णयुगात घेऊन जातील. महान शोमॅन राज कपूरच्या चित्रपट यात्रेला श्रद्धांजली वाहताना निखिल ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘जीना यहां मरना यहां’ या कालजयी गाण्याची जादू मंचावर जिवंत करताना दिसेल. राज कपूरची नात करिश्मा कपूर तो परफॉर्मन्स पाहून हेलावून गेलेली दिसेल.

भावनावश झालेली करिश्मा कपूर म्हणाली, “तुझा अॅक्ट खूपच छान होता! खरं सांगते आज माझ्या आजोबांनी जर हा अॅक्ट पाहिला असता, तर ते खूपच खुश झाले असते. त्यांनी तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद दिले असते. मला वाटते, या गाण्याचे जे शब्द आहेत ते माझ्या कुटुंबाला तंतोतंत लागू होतात. आम्हाला पैसा नको आहे आम्हाला प्रेक्षकांची दाद हवी आहे. आमच्या कलेवर लोकांनी प्रेम केले पाहिजे, जी सगळ्यात मोठी पावती आहे. आम्हाला हीच मूल्य शिकवण मिळाली की, पैसा गौण आहे पण चांगली मूल्ये, जीवन, कुटुंब- या सगळ्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटते, म्हणूनच आमच्या कुटुंबात कलाकारांच्या पिढ्याच्या पिढ्या जन्माला आल्या. याचे श्रेय माझे आजोबा राज कपूर यांनाच जाते.”

अनुराग बसू परफॉर्मन्सचे कौतुक करताना म्हणाला, “मी निःशब्द झालो आहे. ज्यावेळी असा एपिसोड असतो, ज्यात तुम्ही त्या त्या काळातील महान कलाकारांना आपल्या परफॉर्मन्समधून श्रद्धांजली वाहात असता, त्यावेळी तुम्ही ज्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करत आहात त्या व्यक्तीपेक्षा तुमची कला मोठी होऊ शकत नाही. या अॅक्टमध्ये तुम्ही हा तोल छान सांभाळलात. तुम्ही खरोखरच श्रद्धांजली अर्पण केलीत राज कपूर साहेबांना, या गाण्याला, या चित्रपटाला आणि त्या युगाला- आणि हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आज आपण इथे आहोत, आज या शो चे अस्तित्व आहे. जर ते नसते, तर आपण कुठे असतो? तुमचा परफॉर्मन्स अफलातून होता!”

पुढे या चित्रपटाविषयी बोलताना अनुराग बसू म्हणाला, “या गाण्यातील ‘जग को हसाने बहरूपीया रूप बदल फिर आएगा’ ही ओळ वास्तविक या चित्रपटासाठी लिहिण्यात आली नव्हती. राज कपूर साहेब आधी ‘बहरूपीया’ नावाचा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटात त्यांची जोकरची भूमिका होती. पण, काही कारणामुळे तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर, जोकरची व्यक्तिरेखा त्यांच्या मनात घर करून राहिली. आणि मग त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट बनवला.” अनुरागशी सहमत होत करिश्माने पुढे सांगितले की, त्यांनी हा चित्रपट किती प्रेमाने बनवला. तो बनवण्यासाठी त्यांनी काय काय सहन केले. पण, त्यांच्या या सिनेमाच्या वेडाने आणि सिनेमावरील प्रेमाने ‘मेरा नाम जोकर’ एक कल्ट चित्रपट ठरला.

या वीकएंडला बघायला विसरू नका, ‘ईराज ऑफ बॉलीवुड’ इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये, रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे