Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

साक्री–शिर्डी महामार्गावर बस-दुचाकी चा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

0 4 2 9 5 7

भगवान पवार, पिंपळदर (प्रतिनिधी) –

सटाणा- दि. ८ सप्टेंबर रोजी साक्री–शिर्डी महामार्गावरील बागलाण तालुक्यातल्या विरगाव ते वनोली दरम्यान आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला असून,या अपघातात सटाणा येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गोविंद काळू पवार
गोविंद काळू पवार
रोशन दयाराम माळी
रोशन दयाराम माळी
विकी दयाराम माळी
विकी दयाराम माळी

मृतांमध्ये सटाणा शहराजवळील सुकडनाला परिसरातील,आदिवासी कुटुंबातील विकी दयाराम माळी (वय १९), रोशन दयाराम माळी (वय २८) आणि गोविंद काळू पवार (वय ३८) यांचा समावेश आहे. विकी आणि रोशन हे दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. हे तिघे जण एकाच दुचाकीवरून सटाण्यावरून ताहाराबादकडे दुचाकी क्रमांक MH 41 BS 4124 ने जात असताना, ताहाराबादकडून सटाण्याकडे येणाऱ्या नंदुरबार–वसई बस क्रमांक MH 14 LX 8849 सोबत समोरासमोर धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की मोटार सायकल बसच्या पुढील भागात पूर्णपणे घुसली आणि यात दुचाकीवरील या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत, सुधीर साप्ते, बाळासाहेब टिळेकर, निंबा खैरनार, योगेश पवार, सिकंदर कोळी, किशोर सूर्यवंशी आणि नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविले पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती व दुतरफा वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. यावेळी पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मोठी कसरत करावी लागली.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे