महिरावणीच्या मातोश्री गि.दे.पाटील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
विद्यालयाचा शेकडा निकाल ९५.९१,कुमारी ईश्वरी खांडबहाले प्रथम
नाशिक: प्रतिनिधी
महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२४मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाचा शेकडा निकाल ९५.९१ लागला आहे.कुमारी ईश्वरी गोरख खांडबहाले हिने शेकडा ८८ गुण मिळवून विद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
परीक्षेत ९८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ९४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यापैकी पहिले पाच क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक-कुमारी ईश्वरी गोरख खांडबहाले शेकडा ८८.००गुण,द्वितीय- कुमारी स्नेहल सोमनाथ खांडबहाले शेकडा८५.८०गुण,तृतीय-कुमारी ज्ञानेश्वरी अनिल आहेर शेकडा८४.८०गुण, कुमारी त्रिशा नवनाथ साळवे शेकडा८४.८०गुण,चतुर्थ- कुमारी सोनाक्षी अरुण मते शेकडा८४.४०गुण,कुमारी कावेरी समाधान पगार शेकडा८४.४०गुण,कुमार राजेश ज्ञानेश्वर मेढे शेकडा ८४.४०गुण,पाचवा-कुमारी कावेरी कैलास खांडबहाले शेकडा ८४.००गुण मिळून यश संपादन केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अशोक भदाणे, संजय पवार, बाळासाहेब सोनवणे, देवेंद्र देवरे,संजय गायकवाड, सुरेखा भामरे, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले, खंडू लांबे, दिलीप खांडबहाले, विलास येवले यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे,शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामस्थ,पालक वर्ग,माजी विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले.
दिव्यांग गटामध्ये प्रसाद कापसे प्रथम:-
विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी कु.प्रसाद पोपट कापसे याने शेकडा ७५.२० गुण मिळून दिव्यांग विभागामध्ये नाशिक तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सदर विद्यार्थ्यास वेळोवेळी घरी जाऊन विशेष शिक्षिका स्नेहल रिसोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे शिक्षणाधिकारी(माध्य.) प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथ.) नितीन बच्छाव,गटशिक्षणाधिकारी मिता चौधरी, विस्तार अधिकारी मोहन रणदिवे,केंद्रप्रमुख तुकाराम कदम,मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी कौतुक केले.