
नाशिक येथील द्वारका सर्कल जवळील उड्डाण पुलावर पिकअप (MH 15 फाव 5601) अन् आयशर (MH 25 U 0508) यांच्यात भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेल्या पाच कामगारांचा दुर्दैवी अंत झाल्याचे समजते. तथापि अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. निफाड येथून देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील प्रवासी सिडकोतील सह्याद्री नगर येथील असल्याचे समजते.
लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.
अपघातातील प्रवासी सिडकोतील सह्याद्री नगर येथील असल्याचे समजते. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.