Breaking
आंदोलनगुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

फेसबुकच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे लासलगावात तणाव

नागरिकांनी निषेध नोंदवत, लासलगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन

0 3 2 1 2 3

फेसबुकच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे लासलगावात तणाव

लासलगाव (प्रतिनिधी) ….

लासलगाव आणि परिसरात समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) काही व्यक्तींविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोस्टमध्ये लासलगाव, निमगाव वाकडा येथील प्रतिष्ठित नागरिक, गावचे माजी सरपंच, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, लासलगाव बाजार समितीचे संचालक संदीप (ललित) दरेकर, निमगाव वाकड्याचे माजी सरपंच मधुकर गायकर यांच्यासह काही व्यक्ती आणि मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी फेसबुकवर काही पोस्ट व्हायरल झाल्या, ज्यात प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करण्यात आली आहे. या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ज्या व्यक्तींनी या पोस्ट केल्या आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी ११ फेब्रुवारी रोजी लासलगाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्व नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, पालकमंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), उप विभागीय पोलीस अधिकारी (निफाड), उप विभागीय अधिकारी (प्रांत) आणि तहसीलदार (निफाड) यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
या घटनेमुळे लासलगाव आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी डॉ.सुजित गुंजाळ, उपसरपंच रामनाथ शेजवळ, माजी जी प सदस्य डी के नाना जगताप, स्मिता कुलकर्णी, डॉ. विकास चांदर, शिवा सुरासे, प्रवीण कदम,कैलास केदारे ,संजय बिरार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या निवेदनावर सरपंच योगिता पाटील, माजी सरपंच अफजल भाई शेख, राजेंद्र चाफेकर ,सचिन होळकर, मंगेश गवळी ,बबन शिंदे, संतोष ब्रम्हेचा ,डॉक्टर श्रीकांत आवारे, प्रवीण कदम, डॉक्टर अमोल शेजवळ, गोकुळ पाटील, तानाजी आंधळे, राजेंद्र कराड, संदीप उगले, संदीप होळकर ,दिलीप पाटील, मधुकर गायकर, योगेश पाटील, दिलीप पाटील, निलेश पटणी, मधुकर गावडे , शिवा सुराशे , मयूर बोरा, काजी भाभी, सुनिता जोशी नलिनी शिंदे, माया होळकर ,योगिता परदेशी, मनीषा वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे