क्रिडा व मनोरंजनसामाजिक
पुनःप्रदर्शनानंतरही ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने रसिकांच्या मनावर केले राज्य

0
2
5
6
7
7
पुनःप्रदर्शनानंतरही ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाने रसिकांच्या मनावर केले राज्य
नाशिक, २५ फेब्रुवारी २०२५ : ‘सनम तेरी कसम’ हा २०१६ मधील रसिकप्रिय रोमँटिक चित्रपट त्याच्या मूळ प्रदर्शनाला बरोबर नऊ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. पहिल्या प्रदर्शनाच्या वेळेस ‘सनम तेरी कसम’ बॉक्स ऑफिसवर यश मिळविण्यात यशस्वी झाला नाही, परंतु कालांतराने या चित्रपटाने कल्ट लोकप्रियता मिळविली. त्यातील भावनिक कथानक आणि भावपूर्ण संगीताशी चाहते खोलवर जोडले गेले आहेत. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चाहत्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केल्यामुळे चाहत्यांच्या प्रेमामुळे चित्रपटाला मिळालेले पुनरुज्जीवन अभूतपूर्व उंचीवर नेऊ शकते, हे त्यातून सिद्ध झाले आहे.
पुनःप्रदर्शनानंतर लगेचच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ठरला. ‘सनम तेरी कसम’ ने २०१६ मध्ये पहिल्यांदा ९ कोटी रुपयांची कमाई केली होती, मात्र १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्याने तब्बल ३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने केवळ २०२५ मध्ये २७ कोटी रुपयांची कमाई करणे हे अद्भुत आहे. चाहत्यांचा दमदार प्रभाव, दर्जेदार कथाकथनाचे महत्त्व गहन भावनिक संबंध आणि अविस्मरणीय अभिनय हे या उल्लेखनीय कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.
या यशातील लक्षणीय श्रेय हिमेश रेशमिया यांनी रचलेल्या कालातीत, भावपूर्ण संगीताला दिले जाऊ शकते. या चित्रपटाला त्याच्या हक्काच्या प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत ठेवण्यात या संगीताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक जगभरातील चाहत्यांच्या मनात रुंजी घालत आला आहे, त्यातून त्याचा दीर्घकालीन प्रभाव आणि भावनिक खोली सिद्ध झाली आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही या साउंडट्रॅकने वर्चस्व सिद्ध केले आहे. या अल्बममधील ९ पैकी ८ गाण्यांनी स्पॉटिफायवर प्रतिष्ठेच्या टॉप २०० यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये “सनम तेरी कसम” या शीर्षक गीताने ११ फेब्रुवारी २०२५ पासून #१ स्थान कायम राखले आहे. दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळापूर्वी रिलीज झालेल्या कोणत्याही गाण्याने स्पॉटिफायवर क्रमांक एकचे स्थान मिळविलेले नाही. हा चित्रपट आणि संगीताच्या यशाचे हे एक मोठे लक्षण आहे.
‘सनम तेरी कसम’चे संगीत कालातीत आहे, प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षे उलटूनही ते प्रेक्षकांना मोहून टाकत आहे. चित्रपट काळाबरोबर पुढे जात असला तरी, त्याचे संगीत चाहत्यांच्या हृदयात कोरले गेले आहे आणि ते पुढेही त्यांच्या मनात रेंगाळत राहील. कथा कदाचित जुनी होईल, परंतु संगीत कायम जिवंत राहील. ज्या भावना त्याने कधी काळी जाग्या केल्या त्यांचे प्रतिध्वनी निनादत राहतील.
0
2
5
6
7
7