0
4
2
9
5
7
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नाशिक ‘जिल्हाध्यक्ष’ पदी राहुल कदम यांची नियुक्ती*
*नाशिक दि. १५ (प्रतिनिधी)* :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नाशिक ‘जिल्हाध्यक्ष’पदी राहुल कदम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली आहे.

कॅबिनेट मंत्री मा.ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्या शुभहस्ते राहुल कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी माजी खासदार समिरभाऊ भुजबळ, पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद सोनवणे, प्रदेश पदाधिकारी सुशांत काकड, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
राहुल कदम यांच्या निवडीबद्दल उप मुख्यमंत्री ना.अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, मंत्री ना.नरहरी झिरवाळ, मंत्री ना.माणिकराव कोकाटे, आ.नितीन पवार, आ.दिलीप बनकर, आ.हिरामणजी खोसकर, आ.सरोज आहिरे, आ.पंकज भुजबळ आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
0
4
2
9
5
7



