Breaking
क्रिडा व मनोरंजन

रितेश भाऊंसोबत दिमाखात पार पडणार ग्रँड फिनाले!

0 4 7 2 1 4

“अंतिम टप्पा, अंतिम निर्णय… कोण होणार विजेता?”

रितेश भाऊंसोबत दिमाखात पार पडणार ग्रँड फिनाले!

पहा १९ एप्रिल रात्री. ८ वा. आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

नाशिक : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपणार, अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळणार. आता उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आपल्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पर्वातील टॉप ५ स्पर्धक – राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन आता अंतिम लढतीसाठी सज्ज झाले आहेत. मैत्री, संघर्ष, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेल्या या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून, आता सर्वांची नजर एका क्षणावर खिळली आहे; कोण उचलणार या सिझनचा किताब? याच भव्य सोहळ्यात रितेश देशमुख यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार असून, त्यांच्या खास अंदाजाने या संध्याकाळची रंगत अधिक खुलणार आहे. १९ एप्रिलला मनोरंजनाच्या महासंग्रामाचा बादशहा ठरणार. तेव्हा पहा बिग बॉस मराठी सिझन ६ ग्रँड फिनाले १९ एप्रिल रात्री ८ ते रात्री ११ वा आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

या भव्य सोहळ्यात केवळ विजेत्याची घोषणा होणार नाही, तर मनोरंजनाचा एक अद्वितीय जल्लोष रंगणार आहे. TOP 5 चे दमदार परफॉर्मन्सेस, घरातील अविस्मरणीय क्षणांचा आढावा आणि अनेक सरप्राइज एलिमेंट्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे या फिनालेची रंगत अधिकच खुलणार आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी संस्मरणीय ठरेल. अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती जिद्द, संयम आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. एक अविस्मरणीय पर्व, असंख्य आठवणी आणि प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाने सजलेला हा प्रवास आता आपल्या भव्य शेवटाकडे वाटचाल करतो आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोण होणार विजेता हे १९ तारखेला अखेर ठरणार आहे या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहा बिग बॉस मराठी सिझन ६ चा ग्रँड फिनाले १९ एप्रिल, सायं. ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 2 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे