Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

कळवण तालुक्यातील साकोरे पाडा येथे महिलेचा खून, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

0 4 2 9 5 7

कळवण तालुक्यातील साकोरे पाडा येथील उपसरपंचाने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना दिनांक 29 रोजी मध्यरात्रीनंतर घडली. उपसरपंचाने पत्नीवर कुराडीने वार करून दारूच्या नशेत खून केला त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. तसेच भयावह वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की साकोरे पाडा येथील उपसरपंच जयराम पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्यामध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. दिनांक 29 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान पतीने पत्नीवर कुऱ्हाडीचे वार करून खूप केल्याचे समोर आले. या घटनेनंतर जयराम पवार यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना ताब्यात घेऊन कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे