Breaking
ब्रेकिंग

अजित पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट: तरुणावर गुन्हा दाखल

0 4 2 9 5 7

मनमाड ला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल शहर व परीसरात खळबळ,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गुरुकुमार निकाळे यांची तक्रार ,

नाशिक लोकशास्ञ

शांतारामभाऊ दुनबळे

नविन नाशिक- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत अपघातात निधन झाले त्या संदर्भात मनमाड येथे लोक न्याय व्हाट्सऍप गृप सोशल मीडियावर आक्षेपार्ह व संतापजनक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गुरुकुमार निकाळे यांनी दिली आहे याबाबत पोलिस सुमारे दिलेल्या माहितीनुसार

मनमाडजवळील धोटाणे येथील गणेश कुनगर या तरुणाने सोशल मीडियावर अत्यंत वादग्रस्त व समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली होती. अजित पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या श्रद्धांजली पोस्ट्सच्या पार्श्वभूमीवर “असे लोक मेलेच पाहिजेत” अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

या प्रकारामुळे सामाजिक शांततेला धक्का बसण्याची शक्यता असल्याचे नमूद करत गुरुकुमार निकाळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अशा माथेफिरू प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करावी व गुन्हेगारास अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान पोलिसांनी गणेश कुमार यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५६ (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून काही राजकीय नेत्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा परीसरात होत आहे. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात द्वेष, चिथावणी व अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे