Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शेत जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

कळवण तालुक्यातील घटना

0 3 2 1 2 3

गणेश पवार आमदर (कळवण)…

कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोळाखाल येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शेतकरी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
यामधील फिर्यादी व आरोपी सुरेश विठ्ठल पवार हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी व आरोपी हे एकूण चार भाऊ व पाच बहिणी आहेत. त्यापैकी सुक्रीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे मागील दहा वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन तोच कसत होता परंतु सदरची विधवा बहीण एक वर्षांपूर्वी वारल्यानंतर तिच्या वाट्याला आलेली दोन एकर जमीन ही सर्व चार भावंडांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद होता.
दिनांक 26 जानेवारी रोजी फिर्यादी व आरोपी यांचे सर्व नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन बाबत चर्चा सुरू होती, त्यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार विधवा बहिणीस मी सांभाळल्याने तो तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन कोणालाही देणार नाही असा मुद्दा घेऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार व हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार, सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी हेमंत सुरेश पवार यास आपला ट्रॅक्टर आणि यांच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी हेमंत सुरेश पवार यांनी फिर्यादी यांच्या पत्नी जिजाबाई देविदास पवार यांच्या अंगावर घातल्याने त्यामध्ये जिजाबाई पवार या गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला व त्यामध्ये इतर आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण करून जखमी केली आहे. यामधील आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार हे सिविल हॉस्पिटल नाशिक येथे उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अशी माहिती अभोणा पोलीस स्टेशन चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली आहे.

या पाच आरोपींविरुद्ध अभोणा पोलिसात गु र क्र व कलम 32 ऑब्लिक 2025 बीएनएस कलम (103 एक) 109, (118एक) 49,(189दोन ) (191 दोन) (191तीन) 190 अन्वय खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे