गंगापूर रोडला मद्यपी युवतीची पोलिसांशी अरेरावी
मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स, बिअरबारवर लक्ष ठेवण्याची गरज

गंगापूर रोडला मद्यपी युवतीचा मध्यरात्री धिंगाणा
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाशिक /किरण घायदार
ड्रग्स प्रकरणात नाशिकची मध्यंतरी मोठी बदनामी झाली होती. आता गंगापूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास पबमधून मद्यपान करुन आलेल्या एका युवतीने चांगलाच धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळ पोलिसांच्या गस्ती पथकाला मध्यरात्रीच्या वेळेत एक युवक आणि दोन युवती नशेत तर्रर्र दिसून आल्या. पोलिसांना पाहताच एक युवती स्कुटीवरुन निघून गेली तर दुसऱ्या युवतीने मात्र, पोलिसांसोबत चांगलीच हुज्जत घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे पोलिसांशी अरेरावी करण्याबरोबरच तिच्या सोबत असलेल्या युवकाला ती स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणवून घेत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. गंगापूर रोडवर मध्यरात्री झालेल्या या धिंगाण्यामुळे नागरिकांची तसेच बघ्याची मोठी गर्दी जमली होती.
गेल्या काही वर्षांत गंगापूर रोडवर अनेक प्रकारची हॉटेल्स बिअरबार सुरू झाली आहेत. तसेच अनेक ठिकाणी हुक्का पार्लरही चालतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरुन सुसाट वेगाने धावणाऱ्यांची मोठी संख्या पाहावयास मिळते. जोर जोरात आरडा ओरड करुन कर्णकर्कश्श हॉर्न वाजवत धुमाकूळ घालणाऱ्यांमुळे इतर वाहनधारकांना आपले वाहने चालविताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स, बिअरबारवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.