Breaking
आरोग्य व शिक्षण

जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे जनजागृती आणि विशेष मोफत तपासणी शिबिर

0 4 6 8 5 8

“Silent Killer” ठरत असलेला उच्च रक्तदाब; जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे जनजागृती आणि विशेष मोफत तपासणी शिबिर

नाशिक :
दरवर्षी १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) साजरा केला जातो. यानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने उच्च रक्तदाबाबाबत जनजागृती करण्यात आली. आधुनिक जीवनशैली, वाढता ताण, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अनियमित दिनचर्या यांमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

उच्च रक्तदाब (Hypertension) हा अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता शरीरावर परिणाम करणारा आजार असल्यामुळे त्याला “Silent Killer” असेही म्हटले जाते. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनी विकार, दृष्टीदोष तसेच मेंदूवरील गंभीर परिणाम होऊ शकतात.

याबाबत बोलताना डॉ. राकेश पाटील (MD मेडिसिन) म्हणाले,
“उच्च रक्तदाब हा केवळ आकडा नसून संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी गंभीर स्थिती आहे. अनेक रुग्णांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे यामुळे उच्च रक्तदाब प्रभावीपणे नियंत्रित ठेवता येतो.”

डॉ. सुशील अंतुर्लीकर (MD मेडिसिन) यांनी सांगितले,
“आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. झोपेचा अभाव, जंक फूड, धूम्रपान, मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे त्यामागील मुख्य कारणे आहेत. योग्य वेळी जीवनशैलीत बदल केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.”

डॉ. परेश अलवाणी (MD मेडिसिन) यांनी नमूद केले,
“उच्च रक्तदाबामुळे हृदय, मेंदू आणि किडनी यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. अनेकदा रुग्ण औषधे काही दिवसांनी बंद करतात, मात्र उच्च रक्तदाबासाठी नियमित औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य नियंत्रण ठेवल्यास रुग्ण पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतो.”

यावेळी डॉ. अखिलेश सोमानी (Emergency Medicine) यांनी सांगितले,
“आपत्कालीन विभागात अनेकदा अचानक वाढलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास किंवा मेंदूशी संबंधित गंभीर समस्या घेऊन रुग्ण दाखल होतात. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास अशा आपत्कालीन परिस्थिती मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.”

तज्ज्ञांनी नागरिकांना नियमित रक्तदाब तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताणतणाव व्यवस्थापन तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळण्याचे आवाहन केले.

याच अनुषंगाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ३१ मे पर्यंत विशेष मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत BP तपासणी, रक्तातील साखर तपासणी, BMI तपासणी, ECG, नेत्र तपासणी (Eye Check-up) तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियमित तपासणीद्वारे उच्च रक्तदाब व इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे लवकर निदान करून योग्य उपचार सुरू करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे अचूक निदान व आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे