Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

बोगस डॉक्टर वर पोलीस कारवाई ; औषध साठा जप्त

0 3 2 1 0 7

पिंपरखेड ता.नांदगाव येथे अनधिकृत डॉक्टरवर कारवाई, नांदगांव पोलिसांनी केली अटक,औषधसाठा जप्त; गुन्हा दाखल
 यशवंतराव ताडगे पळाशी प्रतिनिधी:- कुठलीही वैद्यकीय परवानगीचे वैद्यकीय शिक्षण व पदवी नसताना , राजरोसपणे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णावर उपचार करून स्वतःची उपजीविका भागविणाऱ्या बोगस डॉक्टरानी लाखों रुपयांची माया जमवली आहे.या अनधिकृत व स्वयंम घोषित वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत असतानाच ,जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर अँलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या पिंपरखेड ता. नांदगाव येथील एका बोगस डॉक्टरांवर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाई करत त्याच्या विरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ,त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडील असणारा उपलब्ध औषध साठा जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे कुठलीही वैद्यकीय परवानगी व शिक्षण नसताना अभिजित जगदीश मुखर्जी या अनधिकृत डॉक्टरने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.रुग्णाच्या जीवाशी खेळत उपचार केले जात होते. त्यांच्या विरोधात विरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मुखर्जी याच्याकडे अँलोपॅथी औषधांचा साठा मिळाला असून, तो जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित मुखर्जी अँलोपॅथिक औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून डॉ. जगताप यांनी आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे व डॉ. दत्तात्रय मोरे यांच्यासह मुखर्जी याच्या पिंपरखेड येथील दवाखाना वर छापा टाकत कारवाई केली.
या झडती दरम्यान मुखर्जी याच्या दवाखान्यात अँलोपॅथिक औषधे, शेड्युल एन. वन. अंतर्गत येणारी औषधे, बी.पी. मशीन, स्टेथोस्कोप, सलाइन स्टँड, डॉक्टर बॅग यांसह उपचार साहित्य आढळले. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. संशयिताने यावेळी बीईएमएस, सीएमएस आणि ईडीपी, डीएनवायएस इलेक्ट्रोपॅथी अशा गैर अँलोपॅथिक पदव्या सादर केल्या. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ चे कलम ३३व भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ३१८(४), ३१९(२) अंतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जगताप यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे तपास करीत आहेत.
अशा प्रकारे अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. अनधिकृत डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी इशारा दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे