Breaking
ब्रेकिंग

डंपरची स्कुटीला धडक, लासलगावच्या चिमुकल्याचा मृत्यू

0 4 6 1 9 7

भरधाव हायवा डंपरची स्कुटीला धडक; ९ वर्षीय अर्नवचा मृत्यू

 किरण कुमार आवारे…

शिरवाडे वाकद :- लासलगाव परिसरात भरधाव वेगाने आलेल्या हायवा डंपरने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ वर्षीय अर्नव संतोष यशवंते याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार (दि.११ मार्च) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात बाळकृष्ण यादव यशवंते (वय ६५, रा. नंदनवन नगर, लासलगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची सून ज्योती संतोष यशवंते या टाकळी विंचूर येथील ‘सेव्हन डे’ इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षिका असून त्या आपल्या मुलगा अर्नव (वय ९) याला दररोज स्कुटीवरून शाळेत आणणे-नेणे करीत असतात.

बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सुमारे २.४५ वाजेच्या सुमारास ज्योती यशवंते या अर्नवसह मेस्ट्रो एज १२५ (एम.एच.४१ बी.ए.१४२९)

स्कुटीने संधान नगरमार्गे वृंदावन नगरकडे घरी जात असताना संधान नगरमधील कॉलनी रोडवर मागून आलेल्या टाटा कंपनीच्या हायवा डंपर (एम.एच.१५ एफ. व्ही.९५४७ ने भरधाव वेगात स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत ज्योती यशवंते या रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या ढिगावर पडल्या, तर अर्नव रस्त्यावर पडला. त्याचवेळी डंपरचे पुढील डावे चाक अर्नवच्या पोटावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला. अपघातात ज्योती यांना हात-पाय व तोंडाला किरकोळ दुखापत झाली असून स्कुटीचेही नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती अर्नवला मृत घोषित केले.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी शाम साहेबराव साळवे (रा.संधान नगर, टाकळी विंचूर) यांनी अपघात पाहिल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी डंपर चालकाला थांबवून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक सोमनाथ राजाराम कोल्हे (वय ३१, रा. सावरगाव, ता. येवला) यास ताब्यात घेतले असून डंपर जप्त केला आहे.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

1/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे