Breaking
निवडब्रेकिंगमहाराष्ट्रसत्कारसामाजिक

सामाजिक क्षेत्रातील माणुसकी फाऊंडेशनचे कार्य अतिशय महत्वाचे – डॉ.शेफाली भुजबळ

0 2 5 5 6 0

अभिनेता संजय खापरे, डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते माणुसकी फाउंडेशनच्या रणरागिणी पुरस्कारांचे वितरण

महिलांनी आपल्या जीवनात धार्मिकतेची जोड द्यावी – डॉ.शेफाली भुजबळ

निफाड :- महिलांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असताना आपल्या आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी. तसेच जीवन जगत असताना महिलांनी धार्मिकतेची जोड द्यावी असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.

महिला दिनाच्या निमित्ताने निफाड बाजार समितीच्या सभागृहात माणुसकी फाऊंडेशनचे वतीने आयोजित रणरागिणी पुरस्कार सोहळा अभिनेता संजय खापरे व डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माणुसकी फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निफाड पूर्व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे, बाजार समितीचे संचालक डॉ.श्रीकांत आवारे, भिमराज काळे, अण्णापाटील बोरगुडे, माजी नगराध्यक्ष अनिल कुंदे, केशव जाधव,बाळासाहेब कापसे, कवी राजेंद्र सोमवंशी, मधुकर शेलार, ज्ञानेश्वर तासकर, मंडल अधिकारी शीतल कुयटे, पत्रकार किशोर पाटील, राहुल सोनवणे, सुमनताई शेलार, प्रजापिता ब्रम्हकुमारी नीता दिदी यांच्यासह महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाले की, केवळ महिला दिनी नाही तर समाजात महिलांचा दररोजच सन्मान मिळत असतो. महिलांनी आपलं जीवन जगत असताना आरोग्याची काळजी घ्यावी तसेच धार्मिकतेची जोड द्यावी त्यातून त्या अतिशय चांगल जीवन जगू शकतात. सशक्त समाजाच्या निर्मितीत महिलांचे योगदान हे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन ते काम करत आहे. संस्थेचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 5 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे