Breaking
देश-विदेशधार्मिकब्रेकिंगसामाजिक

मोटारसायकल वरून केदारनाथ यात्रेसाठी दोन युवकांचे प्रस्थान

0 4 2 9 5 7

मोटार सायकल वरून केदारनाथ यात्रेसाठी बाभुळगाव बुद्रुक येथील दोन युवकांचे प्रस्थान

येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथील युवक अभय पाटील (महावितरण कर्मचारी, लासलगाव) आणि योगेश (देवा) पाटील यांनी केदारनाथ यात्रेसाठी मोटरसायकलवर प्रवास सुरू केला आहे. हे दोघे भक्त एच.एफ. डीलक्स मोटरसायकलवर उत्तराखंडातील केदारनाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा प्रवास मालेगाव, इंदोर, उज्जैन, भोपाळ, आगरा, मेरठ, हरिद्वार, ऋषिकेश, धारादेवी, श्रीनगर आणि शेवटी केदारनाथ (सोनप्रयाग) या मार्गावरून होणार असून, साधारण ३,५०० किलोमीटरचा हा प्रवास मोटरसायकलवर करण्याचा मानस आहे.

या यात्रेपूर्वी त्यांनी मागील वर्षीही उत्तराखंडमधील चार धामांचा मोटरसायकल प्रवास पूर्ण केला होता, त्यामुळे ही त्यांची दुसरी वर्षाची अशी यात्रा आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आई सुमन पाटील, वडील बाळासाहेब पाटील, भाऊ महेंद्र पाटील, वहिनी दिपाली पाटील, पुतण्या अचित पाटील व अबोली पाटील यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच तुळजाई होस्टेल बाभुळगाव येथील विद्यार्थी अनिकेत सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, कृष्णा सोनार, धनंजय बागुल, ओमकार गांगुर्डे, तेजस गांगुर्डे, निखिल सोमवंशी, वैभव जोशी, धनंजय न्हावी, चेतन घुले, उमेश कापडणीस, सिद्धेश्वर दाभाडे व स्वप्निल गोरे यांनीही यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या यात्रेमुळे भक्त अभय आणि योगेश यांना आध्यात्मिक अनुभवासोबतच साहसपूर्ण प्रवासाचा आनंदही लाभेल, अशी अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे