संतांची भूमी म्हटलं की आठवतो,आपला महाराष्ट्र. या भूमीला संत ज्ञानेश्वर , संत नामदेव ,संत सावतामाळी, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई ,संत मुक्ताबाई , यांसारख्या संत परंपरेचा महान वारसा लाभला आहे. सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजेच पंढरीची विठू माऊली. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी ही वारी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला वेड लावून जाते. लाखो भाविक वारकरी वारीमध्ये चालत माऊलीचा जयघोष करत पंढरपूरला जातात. जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते .आषाढी एकादशीपासून चतुर्मासाची सुरुवात होते, अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात आणि चतुर मासा नंतर कार्तिकी एकादशीला जागी होतात. देहु वरून तुकारामांची , त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची ,उत्तर भारतातील संत कबीर यांची तर पैठण वरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येते या पालखीबरोबर सर्व भाविक पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात. पंढरपूर विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे, अवघ्या मानव जातीवर कोणत्याही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं वारकरी विठोबा कडे मागतो .मोठ्या भक्ती भावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताना दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धार्मिक पाणी अध्यात्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा आहे.आषाढी वारी हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट आहे. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भक्त भाविक विठ्ठल माऊली ज्ञानोबा तुकोबा या नामाचा गजर करीत पायी चालत पंढरपूरला येतात. आपल्या जे नेहमीच शहरी जीवन असतं त्यापेक्षा वारी हे जीवन खूप वेगळं असतं , तिथे एक प्रेम आपुलकी जिव्हाळा वारकऱ्यांमध्ये असतो प्रत्येक वारकऱ्यांचा श्वास असणारा पंढरीचे वारीचे महती सांगावी तितकी ती कमी आणि प्रत्येक वारी प्रत्येक वर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे विठूरायाला डोळे भरून पाहणे ही सच्चा वारकऱ्यांची ओळख दिसते, खांद्यावर भगवी पताका घेऊन उन्हातान्हात, पावसा पाण्यात कशाची सुद्धा तमा न बाळगता विठुरायाचा ओढानवर नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात. जागोजागी दानशूर लोक वारकऱ्यांची मनापासून सेवा करतात. त्यांची देखभाल करतात. जागोजागी पावलोपावलांवर त्यांना औषध-पाणी उपलब्ध करून देतात. त्यांच्या सुख सुविधांची काळजी घेतात . अनेक जण वर्षानुवर्ष वारीला जातात. तरी पुढच्या वारीची आसं मनात बाळगून बसतात. पण नेमकी पंढरीच्या वारीची सुरुवात कशी झाली ,पायी चालत जाणाऱ्या वारीची सुरुवात ही बरीच जुनी आहे, तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख सुद्धा सापडतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या घरामध्ये पंढरीच्या वारीच्या परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख सुद्धा आढळतो ज्ञानदेवाने भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन धर्म जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतल आहे. हेच व्यापक रूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज या संतांनी सुद्धा वारीचे परंपरा चालवली . तुकाराम महाराजांच्या कुटुंबामध्ये वारीचे परंपरा होती .ज्ञानदेवांच्या कर्तुत्वामुळे हा संप्रदाय जनमानसांवर हा संप्रदाय जनमानसांवर प्रभाव गाजवून महाराष्ट्र व्यापित झाला संप्रदायाचा आद्यप्रवर्तक ठरतो तो म्हणजे भक्त पुंडलिक . भक्त पुंडलिका पासून या इतिहासाच्या संप्रदाला सुरुवात झाली महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाचा इतिहास हा इतर राज्यांच्या तुलनेत खूप वेगळा आहे .महाराष्ट्रात सुमारे तेराव्या शतकामध्ये भागवत संप्रदायाचा साहित्यामध्ये उल्लेख आढळतो त्यावेळी यादवांचा राज्य होतं त्या राज्यात जातीभेद आणि कर्मकाठांचा भेद होता. संत नामदेव महाराजांनी त्याकाळी कर्मकांडांच्या अंधारात सापडणाऱ्या समाजाला बाहेर काढण्याकरिता प्रबोधनाची चळवळ या वारीच्या माध्यमातून सुरू केली. नारायण महाराज, तुकाराम महाराजांचे तिसरे अपत्य यांनी सुद्धा सोळाशे पंच्याऐंशी साली वारी केली तेव्हा ते आळंदीवरून ज्ञानेश्वरांच्या देहु वरून संत तुकारामाच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते. असे म्हटले जाते की पंढरपूरला जाताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडी वरून विठुरायाच्या मंदिराच्या कळसाच दर्शन झालं, आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओठीन तेथून ते पंढरपूर पर्यंत धावत गेले. त्यांचा स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून ते पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. पंढरपूरच्या वारीची किमान एक हजार वर्षाची परंपरा आहे. लहानपणापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचा आराध्य दैवत असणारा विठोबा त्याच्या भेटीची ओढ वारकऱ्यालाही सुरुवातीपासूनच लागते आणि पायीच पोहोचतात ती थेट पंढरपुरात. भजनात दंग होऊन वारीला जात असतात…..
मनिषा बाळू उगले
समनेरे ता. इगतपूरी (नाशिक)