Breaking
ब्रेकिंग

इंधन टंचाईवर तोडगा; तहसिलदार मा.नाईकवाडे यांचे आश्वासनामुळे लासलगाव बाजार समितीतील लिलाव सोमवारपासून पूर्ववत

0 4 6 8 5 8

इंधन टंचाईवर तोडगा; तहसिलदार मा.नाईकवाडे यांचे आश्वासनामुळे लासलगाव बाजार समितीतील लिलाव सोमवारपासून पूर्ववत

किरण कुमार आवारे, शिरवाडे वाकद :- इंधन टंचाईमुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथील व्यापाऱ्यांनी घेतलेला लिलाव बहिष्काराचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून दैनंदिन शेतमाल लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.

     याबाबत लासलगाव मर्चंट्स असोसिएशन लि. यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. इंधन टंचाईमुळे शेतीमाल वाहतुकीत व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत असोसिएशनने शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. व्यापारी संघटनेच्या निवेदनाची दखल घेत बाजार समितीने शासनाकडे आवश्यक पाठपुरावा केल्याबद्दल असोसिएशनने आभार मानले आहेत. याबाबत निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी सकारात्मकता दाखवल्याने व्यापारी वर्गाने दैनंदिन लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय मागे घेतला असून सोमवारपासून बाजारातील शेतमाल लिलाव नियमितपणे पार पडणार असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

• खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. या समस्येबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

विशाल नाईकवाडे

तहसीलदार निफाड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे