Breaking
अपघातसामाजिक

1600 फूट खोल दरीत आढळला युवकाचा मृतदेह

0 3 2 1 2 3

हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट दरीत ऋषिकेश बाळू जाधव(वय२१) या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. दरम्यान,ऋषिकेशची हत्या, आत्महत्या की अपघात, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.नातेवाईकांनी मात्र या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याचे समजते.

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त रहात होता.परंतु सोमवारी ऋषिकेशचा फोन न आल्या मुळे आई वडिलांनी त्याचा शोध घेतला. त्याचा शोध लागला नसल्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात ऋषिकेश जाधव बेपत्ता असल्याची खबर मंगळवारी (दि.११) रोजी दिली. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो मित्राची मोटर सायकल घेऊन हरिचंद्र गडाकडेगेला असल्याचे सांगितले.ऋषिकेशने त्याच्या लॅपटॉपमधून गुगलवर हरिश्चंद्रगड हे लोकेशन टाकले असल्याचे नातेवाईकांना त्या मित्रा कडून समजले. त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्र गडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे मोटरसायकल उभी केल्याचे दिसून आले. मंगळवारी दुपारी कोकण कड्याच्या १६०० फुट खोल दरीत दुर्बिणीतून मृतदेह दिसला. राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. बुधवारी डेला अडव्हेंचर, लोणावळा आणि नाशिक क्लाइम्बर्स अँड रेस्क्यूर्स असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम पाचनई गावामध्ये रात्रीच्या दोन वाजता पोहचल्यावर पहाटे ४ वाजता हरिश्चंद्रगड गडावर पोहचले.पहाटेच्या कोकण कडावरून रॅपलिंगने चार जणांची टीम अवघड खोल दरीत उतरली.रॅपलिंगने ऋषीकेशचा मृतदेह माथ्या वर आणण्यातआला.राजूर ग्रामीण रुग्णालयात ऋषिकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यातआला.या मोहिमेत सहभागी सदस्य गणेश गीध याच्या नेतृत्वाखालील खंडाळा येथील डेला ऍडव्हेंचर रेस्क्यू टीम, नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशनचे दयानंद कोळी,तनया कोळी, निलेश पवार,किरण खैरे,सागर धात्रक तसेच साम्रत रेस्क्यू टीमचे लहू मुठे,निवृत्ती मुठे,एकनाथ खडगे,तुकाराम बांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

*(किरण घायदार)*

नाशिक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे