ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
भुसावळ येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या ३९ व्या राज्य अधिवेशनाचे आयोजन
0
4
2
9
5
7
भुसावळ येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या
३९ व्या राज्य अधिवेशनाचे रविवार २४ रोजी आयोजन
भुसावळ ( विशेष प्रतिनिधी) – शहरात बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दि. २४ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन कमल गणपती हॉल, शांतीनगर, यावलरोड येथे करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम (नवी दिल्ली), तर उद्घाटक म्हणून सत्यशोधक शेतकरी सभेचे महाराष्ट्र राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले हे उपस्थित राहणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील डॉ. मगन ससाणे (राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमपीए) व्ही. व्ही. जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष) दिपक वासनिक (प्रभारी राष्ट्रीय समीक्षक) माया जमदाडे (राष्ट्रीय कार्याध्यक्षा, भारत मुक्ती मोर्चा) संदीप मानकर (राष्ट्रीय प्रभारी, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क) डॉ. अनिलकुमार माने (राष्ट्रीय अध्यक्ष, बीएमपी, युवा प्रकोष्ट), पी.के. मेश्राम (सी.ई.सी. सदस्य), शिवाजीनाना पाटील (वरीष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा), मौलाना उमरैन महफूज रहेमानी (जनरल सेक्रेटरी मुस्लीम प्रर्सनल लॉ बोर्ड) प्रा.डॉ. दयानंद गोगले (राष्ट्रीय अध्यक्ष, प्रोटॉन), नितीन गायकवाड (सी.ई.सी. सदस्य) डी. आर. गायकवाड (सी.ई.सी. सदस्य) बी. एस. हस्ते (राष्ट्रीय संरक्षक, नफ) व अॅड. राजेश झाल्टे (जेष्ठ विधी तज्ज्ञ, जळगाव) येणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी सुर्यकांत पाटील (रिटायर्ड पोलीस कमिशनर, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ, सोलापूर) नागपूर येथील अॅड. गुणवंत रामटेके ( अधिवक्ता, जिल्हा न्यायालय) डॉ. रघुनाथ बोरकर (पुरातत्व शास्त्रज्ञ), प्रशांत निनावे ( ओबीसी विचारवंत) आदींसह विशेष उपस्थितीमध्ये नरेश पांडुरंग गेडाम पाटील (निवृत्त नगर रचनाकार) डॉ. प्रमोद बळवंत भोसले (विक्रीकर उपायुक्त) आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनात पहिल्या सत्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना घोषित करणे, ओबीसींचा निवडणुकीत होत असलेल्या गैरवापराबाबत चर्चा., शेतकरी, शेतमजूर, कामगार, रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, अनेकांना संविधानिक अधिकारांपासुन वंचित ठेवून सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण रोखण्यासाठी प्रयत्न यांसह सध्या शासन व्यवस्थेकडून रचल्या जात विविध षडयंत्रावर चर्चा होणार आहे. समस्त मुळनिवासी बहुजनांची संघटित शक्ती निर्माण करणे, अनुसुचित क्षेत्रासह ५ वी व ६ वी अनुसूचीचे संरक्षण करणे,आदिवासींचे विस्थापन थांबविण्यावर विश्लेषणात्मक चर्चा, मुळनिवासी धर्म परिवर्तित समुदायाना (जैन, शिख, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, लिंगायत) यांच्या धार्मिक भावना भडकाऊन त्यांना आपापसात लढऊन धार्मिक हल्ले घडवून मॉब लिंचींग करुन ९० टक्के मुळनिवासी बांधवांना आपसात विभाजित करुन गुलाम करण्याचे षडयंत्रावर चर्चा होणार आहे.
या अधिवेशनात लाभलेले प्रमुख वक्ते – प्रेमराज बोबडे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन ककर्मचारी संघ) दिपक इंगळे (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा ), अॅड. प्रदिप वाठोरे (अधिवक्ता, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ) धनाजी सुरवासे ( आेबीसी पॅन्थर ठाणे ), अमित नरवाडे (आंतरराष्ट्रिय कॉर्डिनेटर, बीआयएन), मोहम्मद शफी फारुकी (सहसचिव सदभावना मंच), गजानन उल्हे (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा) प्रा. डॉ. एस.एस.राणे ( प्राचार्य जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव) नवनाथ रेपे (भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक ), रविंद्र कोळी (राज्य महासचिव, प्रवर्तन बहुउद्देशिय संस्था), विक्की बेलखोडे (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बेरोजगार मोर्चा), बिशप आर गायकवाड (जेष्ठ मार्गदर्शक राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, छ. संभाजीनगर) हरविंदरसिंग खालसा ( मार्गदर्शक, राष्ट्रीय शिख मोर्चा ),डॉ. मनोज गावीत (राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ) राम ढीगर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद) एजाज तांबोळी (राष्ट्रीय समिक्षा प्रभारी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ) विकास पाथरीकर (प्रदेश अध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा) आदी मार्गदर्शन करणार आहे.
तसेच दुसऱ्या सत्रात सायंकाळी ७ वाजेपर्यंत, सार्वत्रिक निवडणूक गैरसंवैधानिक ईव्हीएमचा काँग्रेस, बीजेपी या पक्षांकडून होणाऱ्या गैरवापराचे षडयंत्र, बहुजन समाजातील सर्व (१४) सामाजिक समुहाचे बुथ लेवलवर संगठनात्मक जाळे निर्माण करणे, राष्ट्रव्यापी जनआंदोलनास गती मिळण्यावर चर्चा., ओबीसींच्या नावाने धनगर जमातीचा मराठा समाजाच्या विरोधामध्ये वापर आदींसह विविध विषयांवर प्रमुख वक्ते- गोरखनाथ वेताळ (राष्ट्रीय महासचिव, बामसेफ) सचिन बनसोडे (प्रदेश अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा) प्रा. बाळासाहेब सरगर (प्रसिध्द विचारवंत) डॉ. पी. बी. लोखंडे (राज्य उपाध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा) मायाप्पा तुराई (प्रदेश प्रभारी, मौर्य क्रांती संघ), उषा थोरात (प्रदेश प्रभारी, सर्व महिला विंग), प्रा.डॉ. प्रकाश कांबळे (प्रसिध्द विचारवंत), प्रतापदादा पाटील (प्रदेशाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी), मनोज साडेगावकर (राष्ट्रीय संयोजक, भारतीय विद्यार्थी मोर्चा) चंद्रसेन लहाडे (प्रदेशाध्यक्ष, मौर्य क्रांती संघ) शिवश्री नरेश पाटील, डॉ. राहुल भोईटे (वरणगाव), चंद्रकांत चौधरी (सामाजिक कार्यकर्ते, लेवा पाटीदार समाज) अॅड. सुजाता चौदंते (राष्ट्रीय अध्यक्ष, आयएलपीए), बालाजी कांबळे (राज्य महासचिव, बामसेफ, संघटक, अजिक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) आदी मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनास सर्व मुलनिवासी समाजातील नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन बामसेफसह सहयोगी संघटनांतर्फे करण्यात आले असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोजकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी व उपस्थित राहण्यासाठी पुढील मोबाईल संपर्क 8329292004, 9764133404, 9860637860, 9763671654, 9765201024, 7420079841 सपंर्क साधून उपकृत करण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.
0
4
2
9
5
7



