
0
3
2
1
2
3
विंचूर येथील आदित्य दत्तात्रय दरेकर याने पॉवर लिफ्टींंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले. इंडियन पॉवर लिफ्टींंग फेडरेशन (आयपीएफ) च्या वतीने छत्तीसगड येथील बलोद जिल्ह्यातील दल्ली राजहरा येथे क्लासिकल नॅशनल पॉवर लिफ्टींंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिनियर गट ६६ किलो वजनी गटात आदित्य दरेकर हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.आदित्यने विंचूर गावचे नाव देशपातळीवर झळकावले. तसेच विंचूरला प्रथमतःच देश पातळीवरील बहुमान मिळाल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
3
2
1
2
3