
नाशिक / किरण घायदार…
‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, यशोमंगल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा, विलास व्हटकर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी, महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम अहवाल लेखनाबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी आणि नमुना उपक्रमांसाठी महिलांनी www.ShikshakDhyey.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
१) उपक्रमाचे शीर्षक
२) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा
३) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती
४) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे
महिलांनी आपल्या उपक्रमाचा अहवाल/प्रस्ताव बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत वर्ड मध्ये टाईप करुन नंतर त्याची पिडीएफ तयार करून ९६२३२३७१३५ या व्हाटसअॅप नंबरवर पाठवावी. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे.
विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
एका प्रस्तावासाठी नोंदणी शुल्क पाचशे रुपये भरणे बंधनकारक आहे.
नोंदणी शुल्क भरण्यासाठी फोन पे/गुगल पे नंबर ९६२३२३७१३५ हा आहे.
याच मोबाईल नंबरवर शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट आणि उपक्रमाचा प्रस्ताव पाठवावा.
या स्पर्धेसाठी सर्व क्षेत्रातील महिला सहभागी होऊ शकतात.
राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत; यशोमंगल एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे मिलिंद दीक्षित; मुंबईचे समाजसेवक विलास व्हटकर, प्रभाकर कोळसे, वर्धा; डी. जी. पाटील, विजय अहिरे, नंदुरबार; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगाव; मंजू वानखडे, अमरावती; अशरफ आंजर्लेकर, विद्या देवळेकर, रत्नागिरी; अर्चना भरकाडे, अंजली वारकरी, अमरावती; कैलास बडगुजर, ठाणे; राजेंद्र लोखंडे, नितीन केवटे, नाशिक; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर; खुशाल डोंगरवार, भंडारा; वसुधा नाईक, पुणे; प्रेमजीत गतीगंते, संगीता पवार, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; संजय पवार, रायगड, दिवाकर मादेशी, गडचिरोली; सी एच बिसेन, गोंदिया यांनी केले आहे.