Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

नाशिक मध्ये दुहेरी हत्याकांड, जाधव बंधुवर धारदार शश्त्राने हल्ला

0 3 2 1 2 3

नाशिकच्या उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात आरोपीकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि प्रशांत जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांपैकी उमेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहर उपाध्यक्ष होते. दोघा भावांवर वार करून आरोपी तेथून फरार झाले. या हत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हे दोघे बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पुणे नाशिक महामार्ग लगत असणाऱ्या आंबेडकरवाडीतील एका सार्वजनिक शौचालयासमोरून जात होते. यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांना प्रतिकार करता आला नाही. कोयत्याच्या वारामुळे दोघेही जागेवर कोसळले. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी आजूबाजूचे नागरिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, क्राईम ब्रँच चे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कार्यवाही केली.

संपूर्ण नाशिक शहरामध्ये रंगपंचमीचा उत्सव आनंदात साजरा झाला असताना रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी केव्हा थांबेल असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे