जिल्हा रूग्णालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा : डॉ.चारूदत्त शिंदे
नाशिक, दिनांक 19 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : जागतिक आंतराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने 21 जून 2024 रोजी जिल्हा रूग्णालात बाह्य रूग्ण विभागात सकाळी 7 ते 8 या वेळेत योगदिन विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
योग ही अमूल्य देणगी असून मानवाच्या जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांपासून मुक्त करण्यासोबतच आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम नियमित योगाभ्यासाने शक्य आहे. यावर्षी योगाभ्यास स्वत:साठी व समाजासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने उच्च रक्तदाब, स्थुलता, थायरॉईड वृद्धी, मनोविकार, सांध्याचे विकार इत्यादी प्रमाणेच आधुनिक जीवनशैलीची निगडीत आजारांमध्येही योगशास्त्राचे महत्व अनन्यसाधारण आहे.
योग शास्त्राविषयी नागरिकांना माहिती होवून त्यांनी योगाभ्यास दैनंदिन जीवनात अमलात आणण्यासाठी या जिल्हा रूगणालयात आयुष विभागामार्फत 21 जून रोजी केंद्रस्तरावरून नेमून देण्यात आलेले सामुदायिक योग शिष्टाचार (Common Yoga protocol) घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी योग शास्त्राचे दैनंदिन महत्व या विषयावर माहिती देण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.