आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पाच बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

0
2
5
6
3
6
नाशिक, २८ फेब्रुवारी : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे जन्मजात हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पाच बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या. हे सर्व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील असून, काही सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने आणि आर्थिक मदतीने त्यांना हृदयविकारावर आवश्यक उपचार करण्यात आले. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ञ व विभाग प्रमुख डॉ. ललित लावणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. राज नागरकर, व्यवस्थापकीय संचालक व डॉ. निलेश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
डॉ. ललित लावणकर यांनी यशस्वी शस्त्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले, जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Defects – CHD) हे जन्मतःच असलेले हृदयाच्या रचनेतील दोष असून, ते हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. वेळेत उपचार न झाल्यास हे विकार गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. या गुंतागुंतीच्या केसेस ओळखून जन्मजात हृदयविकाराचे लवकर निदान व अचूक शस्त्रक्रिया ही आवश्यक असते. आम्ही उत्कृष्ट बालहृदयरोग उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत, जेणेकरून अशा बालकांना निरोगी आयुष्य मिळू शकेल.
या यशावर चेअरमन डायरेक्टर डॉ. राज नगरकर म्हणाले कि, आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र लहान मुलांचा हृदय विकार विभाग असून या विभागामध्ये हृदय विकार तज्ञ , हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ , लहान मुलांचे अतिदक्षता विभागातील तज्ञ , चौवीस तास उपलब्ध आहेत. लहान बाळांची काळजी घेणारे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा अत्याधुनिक तंत्राचा अवलंबकरून अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी केसेस हाताळण्यात आम्हला यश प्राप्त झाले आहे. गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक वैद्यकीय सेवा समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. या बालकांना जीवनदान देण्याचा आनंद आम्हाला आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचे आणि सामाजिक सहकार्याचे उदाहरण आहे
सीओओ डॉ निलेश सिंग म्हणाले कि, ह्या शस्त्रक्रिया बाल हृदयविकार तज्ञ डॉ ललित लावणकर , लहान मुलांचे हृदय शल्य चिकित्सक डॉ सारंग गायकवाड , पेडिऍट्रिक क्रिटिकल केअर डॉ रचित मेहता , भूलतज्ज्ञ डॉ प्रवीण लव्हाळे, डॉ किरण संधू ,डॉ स्वाती चंद्रात्रे, यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या करण्यात आल्या आहेत. एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धते मुळे हे यश मिळेल आहे. पुढे ते म्हणाले कि, या सारख्या लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे.किम्स मानवता हॉस्पिटलसाठी हा एक मैलाचा दगड आहे. अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबांना ह्या यशस्वी शस्त्रक्रियामुळे नवी आशा मिळाली आहे. आम्ही या कुटुंबाला त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
या बालकांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत त्यांना नवजीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
जन्मजात बाल हृदय रोगाची सामान्य लक्षणे : वारंवार निमोनिया होणे, वजन हळूहळू वाढणे , खूप घाम येणे , चक्कर येणे , लवकर थकवा येणे , छातीत धडधड होणे , बाळ निळे पडणे , बाळाला वरील लक्षण असल्यास तातडीने २डी इको ची टेस्ट करून हृदय विकार तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावा असे आव्हान डॉ ललित लावणकर यांनी केले आहे.
0
2
5
6
3
6