आंदोलनब्रेकिंगमहाराष्ट्र
एसटी महामंडळाच्या सर्व आगार, विभागासमोर निदर्शने

0
2
5
5
5
9
*प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्याची निदर्शने*
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एस.टी. कर्मचाऱ्यांची निरनिराळी प्रलंबित असलेली थकबाकी वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यामुळे नाराजी निर्माण झालेली आहे. कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ रोजी कालावधीची देय होणारी थकबाकी व अन्य प्रलंबित देणी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने काल पेठरोड येथील विभागीय कार्यशाळा तसेच एसटी महामंडळाच्या सर्व आगार, विभागासमोर निदर्शने करण्यात आली.
एस.टी..कामगारांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे, असे असताना सन २०१८ पासून महागाई भत्याची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊनसुध्दा अंमलबजावणी होत नाही. तसेच शासकीय कर्मचा-यांना माहे जुलै २०२४ पासून महागाई भत्याचा दर ५३ टक्के लागू केलेला असून महागाई भत्ता थकबाकी माहे फेब्रुवारी २०२५ देय मार्च २०२५ व्या वेतनात देण्यात आलेला आहे. मात्र एस.टी.कामगारांना महागाई भत्ता अद्याप ४६, टक्केच दिला जात आहे. त्यासुळे शासकीय कर्मचा-यांप्रमाणे ५ टक्के महागाई भत्ता एस.टी.कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा. तसेच घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ पर्यत प्रलंबित आहे ती मिळणे आवश्यक आहे. अशा अनेक प्रलंबित मागण्यासाठी कामगारांत प्रचंड असंतोष आहे. करिता विभागीय कार्यशाळा येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन दराडे, सुनील जाधव, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.
0
2
5
5
5
9