राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात विंचूरच्या विद्यालयाचे सुयश
कर्मवीर विद्यालयाची जिल्हा पातळीवरील मेळाव्यासाठी निवड
विंचूर/प्रतिनिधी – निफाड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात विंचूरच्या कर्मवीर विद्यालयास द्वितीय क्रमांक मिळाल्याने विद्यालयाची जिल्हा पातळीवरील मेळाव्यात निवड झाली.
वैनतेय विद्यालय निफाड येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 27 शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये मानस घायाळ, सार्थक क्षीरसागर, पियुष निकम, वेदांत जाधव, अक्षरा शेलार, जिज्ञासा मुद्गुल, दिव्या दरेकर, प्रणाली शेवाळे यांचा समावेश आहे. त्यांनी ‘ए आय आणि समाज’ या विषयावर उत्कृष्टपणे विज्ञान नाटिका सादर केली, व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले व त्यांची जिल्हा पातळीवरील मेळाव्यासाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना जेष्ठ विज्ञान शिक्षिका जे. व्ही. काळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांंच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन. ई देवढे यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पालक, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ ,उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी, विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जगदीश काका जेऊघाले, अनिल दरेकर व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक के.जी.जोपळे, लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.